शेतात गांजाचे पीक, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, चिकलठाण्याजवळ रात्रीचा थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतीत गांजाचे पीक घेत असल्याने पोलीस कारवाईसाठी आले असता शेतमालकाने साथीदारांना जमवून पोलिसांवर हल्ला चढवला. दगडफेक आणि झटापटीत पोलीस जखमी झाले. तरीही पोलिसांनी मागे न हटता शेतमालकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या हाती गांजाची १५ झाडे लागली. हा थरारप्रसंग चिकलठाणाजवळील बेंबळ्याची वाडी शिवारात बुधवारी (३ डिसेंबर) रात्री ११ ला घडला.

सुपडसिंग रामचंद जोनवाल (वय ४५, रा. लांडकवाडी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे या शेतमालकाचे नाव असून, त्याच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जोनवालला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, असे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी पत्रकारांना सांगितले. बेंबळ्याची वाडी शिवारातील शेतात सुपडसिंग जोनवालने पिकात गांजाची झाडे लावल्याचे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कळले होते. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी सहकाऱ्यांसह शेतात छापा मारण्याचे नियोजन केले.

पोलीस कारवाईसाठी आल्याचे पाहून त्यांना पळवून लावण्यासाठी जोनवालने साथीदार जमवून पोलिसांवर हल्ला चढवला. अचानक जमावाने दगडफेक सुरू केली. यात पथकातील पोलीस जखमी झाले. काही मिनिटे पोलिसांची पिछेहाट होताच जमावाने गांजाची झाडे तोडून नेली. पोलिसांवर हल्ला झाल्याचे चिकलठाणा पोलिसांना कळताच त्यांनीही फौजफाट्यासह धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आक्रमकपणे पुढे जोनवालला ताब्यात घेतले. पोलिसांच्या हाती २ किलो २३० ग्रॅम वजनाची १५ गांजाची झाडे लागली. त्यांची किंमत २५ हजार रुपयांहून अधिक आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software