वाळूज MIDC तील करोडीजवळ मध्यरात्री बर्निंग कारचा थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी परिसरात आणखी एक धावती कार पेटल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री उशिरा सोलापूर-धुळे हायवेवरून वाळूजकडे जाण्यासाठी उतरणारी कार पेटली होती. त्यानंतर बुधवारी (२९ ऑक्टोबर) मध्यरात्री दिल्लीहून कर्नाटककडे जाणारी कार (क्र. एमएच ०१ बीवाय ४३८६) अचानक पेटली. ही घटना करोडी येथील खवड्या डोंगराजवळ घडली.

चालक आदित्य राऊत कारने प्रवास करत असताना अचानक बोनेटमधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ सतर्क होत कार रस्त्याच्या कडेला घेतली. त्यानंतर कारच्या इंजिनने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर येथील अग्निशमन दलाचे उपअग्निशमन अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फायर लीडर के. टी. सूर्यवंशी, चालक ऑपरेटर सी. एस. पाटील, फायरमन एस. टी. मुळे, पी. एस. खाडे, पी. आर. नागरगोजे, एस. व्ही. दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. आगीत कारच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. उपअग्निशमन अधिकारी अनिल देशमुख यांनी सांगितले, की आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software