वाळूज MIDC-छत्रपती संभाजीनगर रोडवर ‘द बर्निंग रिक्षा’चा थरार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : धावत्या ऑटोरिक्षाला अचानक आग लागली. प्रवासी किरकोळ भाजले, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे जिवीतहानी टळली. काही वेळातच पूर्ण रिक्षा आगीत सापडून खाक झाली. हा थरार रविवारी (९ नोव्‍हेंबर) सकाळी पावणेदहाच्या सुमारास शहराजवळील गोलवाडी फाट्याजवळ घडला. रिक्षा वाळूज एमआयडीसीतून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवासी घेऊन येत होती.

रिक्षाला आग लागल्याचे कळताच अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. आगीच्या लपेट्यात सापडलेली रिक्षा रस्त्यातच उभी असल्याने आग विझवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ऑटोरिक्षा (क्र. एमएच २० ईएफ ३०५०) सीएनजी इंधनावर चालत होती. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली आणि प्रवाशांना तत्काळ उतरवून दिले. तरीही काही प्रवासी किरकोळ भाजले गेले. सीएनजी गॅसचा स्फोट होण्याची भीती होती. कांचनवाडी अग्निशमन दलाचे अधिकारी वसीम पठाण, अतुल बनकर, किरण पागोटे, रावसाहेब जाधव, रावसाहेब वाकळे, चालक मनोज राठोड यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून गेली होती. बघ्यांची गर्दी जमली होती.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software