चोरट्यांनी फोडला साडेआठ लाखांचा बॉम्‍ब, पार वाळूज MIDC पोलीस ठाणे हादरले!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी परिसरातील सिडको वाळूज महानगरात चोरट्यांनी दिवाळीआधीच मोठा धूमधडाका केला. दोन अलिशान कारसह सोने-चांदीचे दागिने, रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. ४ नागरिकांच्या घरावर पडलेला चोरट्यांचा बॉम्ब साडेआठ लाख रुपयांत फुटला आहे. ज्याचा आवाज पार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हादरवून टाकणारा ठरला आहे.

ज्ञानेश्वर शेषराव कांडेकर (वय ४१, रा. सिद्धी रेसिडेन्सी, मधुर कॉलनी, सिडको वाळूज महानगर) यांच्या तक्रारीनुसार, ते वाळूज एमआयडीसीतील कासबर्ग कंपनीत नोकरी करतात. पत्नी, मुलासह राहतात. शनिवारी (११ ऑक्‍टोबर) सुटी असल्याने ते पत्नी, मुलासह दिवाळीच्या खरेदीसाठी दुपारी १२ ला छत्रपती संभाजीनगर शहरात गेले होते. खरेदीनंतर सायंकाळी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. बेडरूममधील कपाटाचे लॉक, लॉकरसुद्धा तोडलेले दिसले. कपाटातील कपडे, सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्‍कम गायब होती.

यात १ लाख २६ हजारांचे सोन्याचे गंठण, ४० हजारांचे सोन्याचे कानातील झुंबर, ३ हजारांची सोन्याची नथ, १५ हजारांचे सोन्याचे वेल, १२ हजारांची सोन्याची ठुशी, ३ हजारांच्या सोन्याच्या धातुच्या बाळ्या, ४ हजारांचे सोन्याचे ओम पान, १८०० रुपयांचे चांदीचे बाजूबंद, १८०० रुपयांचे चांदीचे जोडवे, २० हजार रुपये रोख या मुद्देमालाचा समावेश आहे. बजाजनगरातील भोंडवे पाटील शाळेजवळील अंजली अमोल जोशी (वय ४२) यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारून १५ हजार रुपयांची सोन्याची पोत चोरून नेली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

२ अलिशान कारही नेल्या...
भरदिवसा दोन घरे तर फोडलीच पण चोरट्यांनी दोन अलिशान कारही चोरून नेल्या. सिडको वाळूज महानगरातील सूर्यवंशीनगरातील साईप्रीत अपार्टमेंटमध्ये राहणारे सुरेश रमेश क्षीरसागर (वय ३५) हे खासगी नोकरी करतात. त्‍यांची टाटा हॅरियर पांढरी कार (एमएच २० एफपी ८३९४) शनिवारी रात्रीतून चोरट्यांनी चोरून नेली. रविवारी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कार चोरून नेताना चोरटे दिसत आहेत. कारमध्ये ३ हजार ५०० रुयये रोख, १० हजार रुपयांचा कॅमेरा, १ हजार रुपयांचे क्रिकेटचे साहित्यही होते. असा एकूण ३ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला. याशिवाय विलास तुकाराम नवले (वय ४८, रा. सिडको वाळूज महानगर १) यांची साडेतीन लाख रुपयांची हुंदाई क्रेटा कारही चोरीला गेल्याचे रविवारी सकाळी समोर आले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software