जिगरी मैत्री... जेवायला एक ताट, शिकायला एकच शाळा, दुर्दैवाने प्रेमही एकाच तरुणीवर!; एकाने दुसऱ्याला चाकूने सपासप वार करत संपवले!!, पोलिसांनी काही तासांतच आवळल्‍या मारेकऱ्यांच्या मुसक्या!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एकाच तरुणीवर दोन मित्रांचा जीव पडल्याने, एक मित्र दुसऱ्याच्या जिवावर उठला. एकाच ताटात जेवणाऱ्या रितेश विजय नरवडे (वय २१, रा. वाळूज) याने प्रथमेश उर्फ बंटी प्रभाकर गायकवाड (वय २०, रा. नारायणनगर, वाळूज) याची चाकूने सपासप वार करून हत्‍या केली. वाळूज येथील नारायणनगरात लांझी रोडवर बुधवारी (८ ऑक्टोबर) रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने वाळूज हादरून गेले. पोलिसांनी १२ तासांच्या आतच संशयित रितेश आणि त्‍याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्‍या. त्‍याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी परभणी रेल्वेस्टेशनवर दोघांवर झडप घातली.

murder

प्रथमेश आणि रितेश लहानपणापासून जिवलग मित्र होते. एकाच शाळेत शिकले. एकाच ताटात जेवायचे. मात्र, एकाच तरुणीवर दोघांचेही प्रेम जडल्याने वाद निर्माण झाला. त्याग करायला कुणीच तयार नव्हते. त्‍यामुळे धुसफूस वाढत गेली. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रितेशने आईला सोबत घेऊन प्रथमेशच्या घरी येत वाद भांडण केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री प्रथमेश जेवण करून घराबाहेर पडला असता रितेश व त्याचा मित्र प्रदीप बाबासाहेब सुकासे (वय १९, रा. झेंडा मैदान, ता. गंगापूर) दुचाकीवरून आले. काही वेळ बोलणे झाल्यानंतर अचानक रितेशने प्रथमेशच्या बरगडीत धारदार चाकू खुपसला. प्रथमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

आरडाओरड झाल्याने काही वेळातच कुटुंबीयांनी धाव घेऊन त्‍याला नागरिकांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हत्या केल्यानंतर रितेश आणि प्रदीप फरारी झाले. वाळूज पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तैनात केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोघांचे लोकेशन वेळोवेळी मिळवले. रात्रभर माग काढून सकाळी ८ वाजता दोघांना परभणी रेल्वेस्टेशनवर ताब्‍यात घेण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे करत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्‍त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्‍त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाणे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदीप वाघ, नारायण बुट्टे, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, संदीप धनेधर, शेख गफ्फार, श्रीकांत सपकाळ, स्‍नेहलकुमार गवळी, पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software