वृद्धेचा मृतदेह दुकानासमोर ठेवून कुटुंबीयांचा संताप!, मील कॉर्नर भागातील घटना 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाडेकरूशी असलेल्या वादामुळेच वृद्धेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वृद्धेच्या कुटुंबीयांनी मृतदेह भाडेकरूच्या दुकानासमोर तासभर ठेवला आणि ठिय्या मांडला. ते पोलिसांचेही ऐकत नव्हते. हा गुरुवारी (२५ डिसेंबर) घडला. सिटी चौक पोलिसांनी मृतदेहाची विटंबना व अवहेलना केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मिल कॉर्नर परिसरात घडला.

किरण राजू बोरसे, कपिल राजू बोरसे, श्याम राजू बोरसे, कृष्णा राजू बोरसे, स्वप्नील दीपक बोरसे, करण अरुण बोरसे, नितीन गुलाब लिंगायत, लखन वसंत लिंगायत, लखन अरुण बोरसे व सनी गणेश दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, हे सर्व वृद्धेचे नातेवाइक आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक शकुंतला बापूराव बोरसे यांच्या मालकीची मिल कॉर्नर परिसरात इमारत आहे. इमारतीत त्यांनी भारत मेडिकल चालकाला गाळा भाड्याने दिला होता. त्याला वारंवार गाळा सोडण्यास सांगूनही तो खाली करत नव्हता. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले.

मात्र तरीही मेडिकलचालक ऐकत नव्हता. याच वादाचा धसका घेऊन शकुंतला यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका भारत मेडिकल नेत मृतदेह त्याच्या दुकानासमोर ठेवला. घटनास्‍थळी काही राजकीय पदाधिकारीदेखील आले. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. मात्र समजूत घालूनही वृद्धेचे कुटुंब ऐकत नव्हते. तासभर मृतदेह त्यांनी हलवला नाही. बेकायदेशीर जमाव जमवून मृतदेहाची विटंबना, अवहेलना केल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर मिसाळ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software