- News
- सिटी क्राईम
- मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या मुलीला अश्लील इशारे, मुलीने लगावले लाथा-घुस्से!, क्रांतीचौकातील घटनेच...
मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या मुलीला अश्लील इशारे, मुलीने लगावले लाथा-घुस्से!, क्रांतीचौकातील घटनेची अवघ्या शहरात चर्चा... सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एका स्त्रीलंपट, वासनांध कारचालकाला १७ वर्षीय मुलीने क्रांती चौकात सोमवारी (३ नोव्हेंबर) दुपारी ३ ला चांगलाच धडा शिकवला. मैत्रिणीची वाट पाहत मुलगी थांबलेली होती. विकृत कारचालक तिच्याकडे पाहून अश्लील इशारे करू लागला, नोटा दाखवू लागला. मुलीने घाबरून तिथून काढता पाय घेतला. तरीही तो विकृत तिचा पाठलाग करू लागला. अखेर मुलीने जवळच उभ्या वाहतूक पोलिसांना सांगितले. दामिनी पथक तत्काळ घटनास्थळी आले. पोलिसांनी कारचालकाला पकडले. नंतर मुलीला फ्री हँड देण्यात आला. मुलीने मग त्याच्यावर सर्व संताप उतरवत यथेच्छ त्याच्या कानशिला सुजवल्या. खिवाराम कानाराम देवासी (वय ४८, रा. हुबळी, कर्नाटक) असे विकृत कारचालकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१७ वर्षीय मुलगी जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असून, शिक्षणानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात राहते. दुपारी तीनला ती क्रांती चौकात मैत्रिणीची वाट पाहत होती. खिवाराम तेथेच कार घेऊन होता. मुलीला पाहून त्याने अश्लील चाळे सुरू केले. सुरुवातीला मुलीने दुर्लक्ष केले. मात्र त्यामुळे खिवाराम अधिकच चेकाळला. त्याने अश्लील चाळ्यांच्या मर्यादा ओलांडल्या, नोटा दाखवून मुलीला इशारे करू लागला. त्यामुळे मुलगी घाबरून गेली. तिने तिथून काढता पाय घेतला. तसे तो कारने तिच्या मागे मागे येऊ लागला. त्यामुळे मुलगी जास्तच बिथरली. तिने लगेचच जवळच उभ्या वाहतूक पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. वाहतूक पोलिसांनी लगेचच तिला धीर देत लगेचच कारचालकाला पकडले. पोलीस निरीक्षक सुनील माने, दामिनी पथकाच्या अंमलदार निर्मला निंभोरे यांना कळवल्याने तेही लगेचच घटनास्थळी आले. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, दामिनी पथकप्रमुख कांचन मिरधे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

