भाजीमंडीत सुसाट दुचाकीची युवतीला धडक, मदत न पळून गेला... चिकलठाण्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गर्दीचे भान न बाळगता दुचाकी सुसाट चालवत एका तरुणाने युवतीला धडक देऊन जखमी केले. नंतर मदतीला न थांबता पळून गेला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुरुवारी (६ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिकलठाणा भाजीमंडीत घडली.

ओम अशोक लांडगे (रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्राची संतोष नाडे असे जखमी युवतीचे नाव आहे.  माया राजू गायकवाड (वय ४०, रा. अण्णाभाऊ साठेनगर, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ३ नोव्‍हेंबरला दुपारी साडेचारला त्या व त्यांची मुलगी प्राची या चिकलठाणा भाजीमंडीत भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथे ओम लांडगे हा त्याच्या पल्सर मोटारसायकलीने भरधाव आला आणि प्राचीला जोरात धडक देऊन पळून गेला. त्यामुळे प्राचीच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले. उजव्या पायाला मुक्का मार लागला. तिला मिनी घाटीत दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या तिच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश तांबोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software