भररस्त्यात टँकर थांबवून एलपीजी सिलिंडर भरणे सुरू; आ. बंब यांना कळले... पुढे जे घडलं ते धक्कादायक...

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : घरगुती गॅस भरून निघालेल्या टँकरला भररस्त्यात थांबवून त्यातील गॅस धोकादायक पद्धतीने अवैधरित्या सिलिंडरमध्ये भरण्याच्या प्रकाराचा खुद्द आमदार प्रशांत बंब यांनी पर्दाफाश केला. वाळूज एमआयडीसीला लागून हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येताच बंब यांनी तातडीने यासंदर्भात भारत पेट्रोलियम आणि स्फोटक पदार्थ सुरक्षा संस्थेला (पीईएसओ) पत्र लिहून कारवाईची मागणी केली. यानंतर संस्थेने तातडीने चौकशी सुरू करतानाच त्या टँकरचा परवाना रद्द केला.

गंगापूर परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती आमदार बंब यांना मिळाली होती. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून (केए ०१ एएच ०८२८) अवैध गॅस रिफिलिंग सुरू असतानाच बंब यांच्या सहकाऱ्यांनी त्याचे चित्रीकरण केले. विशेष म्हणजे घटनास्थळी शेकडो सिलिंडर होते. मात्र, या गोदामात कोणतीही सुरक्षायोजना दिसून आली नाही. यानंतर आमदार बंब यांनी तातडीने या संदर्भात पीईएसओला पत्र लिहिले. पीईएसओने देखील त्याची गंभीर दखल घेत तातडीने त्या टँकरचा परवाना निलंबित केला. स्टॅटिक्स अँड मोबाईल प्रेशर व्हेसल नियम २०२६ आणि गॅस सिलिंडर नियम २०२६ चे उल्लंघन केल्याचा ठपका या टँकरच्या मालकावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. 

आ. बंब संतापले... म्हणाले असे प्रकार रोखणार ! 
आमदार प्रशांत बंब यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, औद्योगिक परिसरात असा धोकादायक प्रकार करणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणेच आहे. बिनधास्त चालणारा हा प्रकार म्हणजे पोलीस आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस आहे. लाखो लीटर गॅस असलेले टँकर तेथे बिनधास्त खाली करणे सुरू होते. खरे तर टँकर गॅस भरून कंपनीतून निघते, तेव्हापासून जीपीसच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवायला हवे. पण असे घडत नाही. मात्र, आता मी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करून या सगळ्या अवैध गोष्टींचा पर्दाफाश करणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software