भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला जोरात धडक दिली. यात मायलेकी जखमी झाल्या. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील लाडगाव टोलनाक्यासमोर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. करमाड पोलिसांनी पिकअपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सारीका संतनाथ उर्फ संतोष काटे (वय ३४, रा. वैराग ता. बार्शी जि. सोलापूर. ह. मु. लाडगाव ता. जि. छ संभाजीनगर) यांचा जबाब पोलिसांनी साईनाथ हॉस्पिटलमध्ये नोंदवला. त्या व त्यांचे पती शेंद्रा एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरी करतात. १२ जानेवारीला सायंकाळी सहाच्या सुमारास मुलगी समृद्धीला क्लासवरून आणण्यासाठी सारीका या कुंभेफळ येथे गेल्या होत्या. मुलीला घेऊन लाडगावकडे घरी येत असताना लाडगाव टोलनाक्यासमोर जीमजवळ करमाडकडून भरधाव आलेल्या पिकअप वाहनाने (क्र. एमएच २० ईएल ७६८९) त्यांच्या स्कुटीला (क्र. एमएच १३ डीएक्स ८०५६) जोरात धडक दिली. स्कुटीमागे बसलेली त्यांची मुलगी समृद्धीला (वय ११) गंभीर मार लागला. सारीका याही जखमी झाल्या. सारीका यांनी पतीला कॉल करून बोलावल्यानंतर त्यांनी दोघींना छत्रपती संभाजीनगर शहरातील साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस अंमलदार प्रशांत नांदवे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software