पत्‍नी, तिचा प्रियकर मेसेज करून त्रास देत असल्याने युवकाची आत्‍महत्‍या!; छत्रपती संभाजीनगरची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पत्नी आणि तिचा प्रियकर मेसेज करून त्रास देत असल्याने आणि सासू-सासरेही धमक्या देत असल्याने त्रास असह्य झालेल्या ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना चितेगाव (ता. पैठण) येथे समोर आली आहे. बिडकीन पोलिसांनी युवकाची पत्नी, तिचा प्रियकर, सासू, सासरे अशा चौघांविरुद्ध मंगळवारी (२३ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे. आत्‍महत्‍येची घटना सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारी समोर आली होती.

रामा गोविंदा ठोंबरे (वय ७२ रा. उमरा, पो. शिरड शहापूर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते त्यांचा मोठा मुलगा श्याम, सून मनिषा, तीन नातू यांच्यासह राहतात. ते व मुलगा श्याम शेती करतात. त्यांचा लहान मुलगा बालाजी रामा ठोंबरे (वय ३५) याचे लग्न सन २०१६ मध्ये बाबाराव गंगाराम बळवंते (रा. दांडेगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, ह. मु. चितेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची मुलगी मनिषासोबत दांडेगाव (ता. कळमनुरी) येथे झाले होते. लग्नानंतर लहान मुलगा बालाजी व त्याची पत्नी मनिषा उमरा येथे राहत होते.

सन २०२२ मध्ये सून मनिषा कुणास काहीएक न सांगता घरातून निघून गेल्यामुळे बालाजीने कुरुंदा पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर सुमारे एक महिन्याने मनिषा तिच्या माहेरी आई- वडिलांच्या घरी असल्याचे समोर आले. तेव्हापासुन बालाजीदेखील पत्नी मनिषासोबत चितेगाव येथेच राहत होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये बालाजीने वडिलांना कॉल करून सांगितले, की माझे पत्नीसोबत जमत नाही. त्यामुळे मी दोन महिन्यांपासून वेगळी रूम करून राहत आहे. मनिषा आई-वडिलांकडे राहत आहे. मी मेसवर जेवण करतो व कंपनीत कामाला जातो... असे त्याने सांगितले. त्यानंतर सुमारे १५ दिवसांपूर्वी बालाजीने परत वडिलांना कॉल करून सांगितले, की मनिषाचे आई- वडील माझ्या रूमवर येऊन माझ्याशी भांडण करतात.

शेवटी जे होऊ नये तेच झाले...
२२ डिसेंबरला दुपारी दीडच्या सुमारास रामा ठोंबरे यांना पुतण्याने कॉल करून बालाजीने चितेगाव येथे राहत्‍या खोलीत गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे सांगितले. बालाजीने आत्‍महत्‍येपूर्वी वडिलांना १९ डिसेंबरला संध्याकाळी ७ च्या सुमारास व्हॉटस् ॲपवर स्क्रीनशॉट पाठविले होते. बालाजीचे वडील, मोठा भाऊ व अन्य नातेवाइक २३ डिसेंबरला चितेगाव येथे आले. बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात बालाजीचा मृतदेह आणलेला होता. बालाजीकडे मृत्‍यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली होती. त्यात त्याने सासू-सासरे व बायको मला खूप त्रास देत आहेत जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ करत आहेत. माझे पैसे त्यांनी घेतले. बायकोचे अफेअर पकडले म्हणून... आदी आरोप केले आहेत. बालाजीला पत्नी व तिचा प्रियकर हे मेसेज करून परेशान  करत असल्याने सासू, सासरे व बायको मरणाचे कारण असल्याचे चिठ्ठीत नमूद केलेले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

Latest News

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर...
अवघे छत्रपती संभाजीनगर शहरच ‘गॅस’वर!; घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई, ९२१ रुपयांचा सिलिंडर २ हजार रुपयांनी विकताहेत विक्रेते, प्रशासनाचे दावे फोल, दावे करण्यापेक्षा आता थेट टीम बनवून छापे मारा... शहरवासियांची मागणी!!
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software