चिकलठाणा परिसरातील शिवा ट्रस्ट शैक्षणिक संस्थेत जमावाचा धुडगूस, संस्थाचालक डॉ. पवार यांना धमकावले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : शिवा ट्रस्ट शैक्षणिक संस्थेत १५ ते १७ लोकांनी धुडगूस घातला. दुसरा रस्ता असतानाही संस्थेच्या परिसरातूनच जाण्याचा हट्ट धरत त्‍यांनी संस्थाचालक डॉ. बाळासाहेब पवार यांना धमकावले. जीवे मारण्याची धमकी दिली. अंगावर धावून गेले. डॉ. पवार यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांनी आज, १९ सप्‍टेंबरला धुडगूस घालणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शिवाजी पवार (वय ५५, रा. संत तुकोबारायनगर एन २ सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांची निपाणी शिवारात शिवा ट्रस्ट आहे. संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे तसेच मागासवर्गीय प्रवर्गाचे जास्तीत जास्त वि‌द्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवा ट्रस्ट शैक्षणिक संस्थेच्या मागील बाजूला पश्चिम दिशेला निपाणी येथील अण्णा गोविंद काकडे व उत्तम गोविंद काकडे या दोघा भावंडाची शेती आहे.

शेत जमिनीत जाण्यासाठी काकडे बंधूंना संस्था संकुलाच्या पूर्व बाजूने डोंगर काठाजवळून रस्ता उपलब्ध आहे. मात्र हे शेतकरी जाणीवपूर्वक संस्थेच्या कॅम्पसमधील रस्त्याचा त्यांच्या शेतात जाण्यासाठी वापर करतात. बुधवारी (१७ सप्‍टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास डॉ. पवार हे शैक्षणिक इमारत परिसरात असताना लक्ष्मण उत्तम काकडे, उत्तम गोविंदा काकडे, अण्णा गोविंदा काकडे, श्रीराम अण्णा काकडे, टेम्पोचालक अर्जुन (पूर्ण नाव माहीत नाही) हे मोटारसायकल व टेम्पोने सोबत अनोळखी १० ते १२ जण सोबत घेऊन आले. त्‍यांनी कॅम्पस परिसरातील रस्त्याने धुडगूस घालायला सुरुवात केली. डॉ. पवार व संस्था कर्मचारी विशाल धर्मा चव्हाण, विक्रांत सुभाष डिघोळे, सुनिल गरंडवाल यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्‍न केला.

डॉ. पवार यांनी त्यांना तुमचा हा कायदेशीर रस्ता नसताना तुम्ही आम्हाला त्रास देण्याच्या उ‌द्देशाने संस्था परिसरातून का जाता, असे विचारले. त्यावर त्यांनी डॉ. पवार आणि सहकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आम्ही याच रस्त्याने जाणार. आम्हाला तुम्ही अडवून दाखवा. तुमचे तंगडे तोडू. तुम्ही जर आमची पोलिसांत तक्रार केली तर तुमच्या कॉलेजला आग लावू, असा दम दिला. अंगावर येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे डॉ. पवार व संस्थेतील कर्मचारी, विद्यार्थी भयभीत झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software