रात्री लुटले, थर्टिफर्स्ट साजरे केले, पहाटे घरी आले तर स्वागताला पोलीस!; सराईत गुन्हेगारांना अवघ्या काही तासांत अटक, वाळूज MIDC पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासगी नोकरदाराला लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना वाळूज एमआयडीसीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आज, १ जानेवारीला अटक केली. बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री त्यांनी लुटले अन्‌ नवीन वर्षाची पहाट होण्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या, हे विशेष. गजानन फकिरा जाधव (वय २५), सचिन भुजंगराव मिसाळ (वय ३४, दोघे रा. पवननगर, रांजणगाव शेणपुंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

klu

खासगी कंपनीत नोकरी करणारे एकनाथ धोंडीबा चौधरी (वय ३२, रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, जयभवानी चौक, बजाजनगर) यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, की बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री साडेआठला ते घरातील कचरा टाकण्यासाठी बजाजनगरमधील स्टरलाइट कंपनी गेटसमोरील अंकुर हॉटेलजवळील साई मंदिर कमानीजवळील कचरा कुंडीकडे गेले होते. तेथे दोन लुटारूंनी येऊन त्यांना अंधारात नेत हाताचापटांनी मारहाण केली. खाली पाडून खिशातील मोबाइल फोन  (किंमत ५ हजार रुपये) व कानातील सोन्याची दीड ग्रॅमची बाळी (किंमत ८ हजार ७४५ रुपये) हिसकावून पळून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हे प्रकटीकरण पथकाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात दोघांची ओळख समोर आली. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. ते राहत असलेल्या ठिकाणी सापळा लावला. दोघे पहाटे घरी आले  असता लगेच पोलिसांनी झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघेही सराईत लुटारू आहेत.

त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस अंमलदार कचे, सय्यद चांद, नितीन ईनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुरेश भिसे, संदीप तागड, शिवनारायण नागरे, रोहित चिंधाळे, राजू वाघ, अविनाश ढगे यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software