सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भाजप पदाधिकारी असलेल्या सामाजिक कार्यकर्तीने फेसबुकवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करणारी पोस्ट टाकली म्हणून संतापलेल्या २३ जणांनी अश्लील शिवीगाळीचा अक्षरशः भडीमार केला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या सामाजिक कार्यकर्तीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी या २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

३७ वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या मिसारवाडीतील साईनगरात पती व मुलासह राहतात. त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत. पक्षाच्या माध्यमातून अनुसूचित जातींसाठी काम करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा प्रकल्पात १५ वर्षांपासून काम करत आहेत. समाजाला संघ काय आहे, हे समजून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. २५ ऑक्टोबरला त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली, की मी मागासवर्गीय समाजातील असून १५ वर्षांपासून रा. स्व. संघाच्या सेवा प्रकल्पात काम करते. संघ समजून न घेता चुकीचे आरोप करणे अयोग्य आहे... त्यादिवशी सामाजिक कार्यकर्ती महिला घरी असताना तिने फेसबुकवर पाहिले, की ‘मै नस्तिक किरण जाधव’ नावाच्या फेसबुक युझरने पोस्टला टॅग करून त्यावर अश्लील व गलिच्छ भाषेत कमेंट केली आहे.

त्यानंतर मंगेश गणपतराव कानिटकर, अरुण गायकवाड, अशोक सोनकांबळे, ज्ञानेश्वर इंगळे, तुका विश्वे, जगन्नाथ डोळस, अनिल वाघमारे, गणपत सवर्णे, मोहन सुरडकर, नितेश ससाने, भाऊसाहेब ढोणे, सुनील बोर्डे, दिलीप जोगदंडे, हिरामण पवार, रियल फिजोस्टी, अजय इंगोले, मारोती लटे, राहुल मुन, ज्ञानेश्वर वाघमारे, राजू साबळे या लोकांनी मिळून अश्लील शिवीगाळ केली. त्रास देण्याचे उ‌द्देशाने व बदनामी करण्याच्या उद्देशाने अश्लील कमेंट केल्या. सर्वत्र सार्वजनिक ग्रुपमधे टाकून प्रसारीत करून लोकामध्ये बदनामी केली, असे तक्रारीत सामाजिक कार्यकर्तीने म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software