मी कांचा.. मी डॉन आहे... दुचाकी चोरी केल्यानंतर पकडला गेल्यावर धमकावले, दुचाकीमालकासह दोघांवर केला प्राणघातक हल्ला!, विश्रांतीनगरातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुंडाराज सुरूच आहे. आता तर हद्दच झाली. एका गुंडाने दुचाकी चोरून गॅरेजवर आणली. दुचाकी शोधत तिथे दुचाकीमालक आणि त्याचा घरमालक असे दोघे पोहोचले असता गुंडाने साथीदारासह मिळून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. लोक जमल्याने गुंड आणि त्याचा साथीदार पळून गेले. ही घटना सोमवारी (१६ डिसेंबर) सकाळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्रांतीनगरात घडली. पोलिसांनी कांचा नावाच्या गुंडासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमोल अशोक रूडे (वय ३९, रा. बंबाटनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांच्या घरात किरायाने प्रकाश दीपा चव्हाण राहतात. सोमवारी (१६ डिसेंबर) सकाळी ८ च्या सुमारास ते रात्रपाळीची ड्युटी करून घरी आले. गल्लीतील लोकांनी सांगितले, की रात्री चोर आले होते. त्यांनी प्रकाश चव्हाण यांची मोटारसायकल चोरून नेली. त्यामुळे रूडे आणि प्रकाश चव्हाण हे मोटारसायकलचा शोध घेत पायी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जात असताना विश्रांतीनगर येथील गॅरेजवर प्रकाश चव्हाण यांची मोटारसायकल (MH20 DA3398) उभी दिसली.

मोटारसायकलजवळ विश्रांतीनगर येथील रीतेश कुऱ्हाडे उर्फ कांचा व एक अनोळखी तरुण उभे होते. रूडे यांनी मोटारसायकलजवळ जाऊन त्याला ही मोटारसायकल कोणी आणली, असे विचारले. प्रकाश यांनी ही माझी मोटारसायकल आहे, असे सांगितले असता रितेश व अनोळखी मुलाने प्रकाश चव्हाण यांची कॉलर धरून मी कांचा आहे, मी डॉन आहे, असे धमकावले. ते मोटारसायकल घेऊन तिथून जात असताना रूडे यांनी त्यांना रोखले असता कांचा व त्याच्या साथीदाराने प्रकाश चव्हाण यांच्या पोटात बुक्क्या मारल्या. रूडे यांच्यावर स्‍क्रू ड्रायव्हरने वार केले. यात रूडे जखमी झाले. तेथे लोक जमा झाल्याने कांचा व त्याचा साथीदार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे पळून गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software