- News
- सिटी क्राईम
- माजी कुलगुरूलाही कल्पनाने लावला चुना!; कोणी किती पैसे दिले जाणून घेऊ...
माजी कुलगुरूलाही कल्पनाने लावला चुना!; कोणी किती पैसे दिले जाणून घेऊ...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिला बेस्ट आयएएस म्हणून प्रशस्तीपत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. शहाबुद्दीन नसिरुद्दीन पठाण यांचीही चौकशी मंगळवारी (२ डिसेंबर) सायंकाळी सिडको पोलिसांनी केली. त्यांनाही १ लाख रुपयांनी कल्पनाने चुना लावल्याचे समोर आले. पुण्यातील एका कार्यक्रमात कल्पनाची आणि त्यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत तिने त्यांना आयएएस असल्याचे सांगितले होते. विविध ओळखी असल्याचे सांगितल्याने त्यांचा विश्वास बसला होता. त्यावरूनच एका कार्यक्रमात त्यांनी तिला प्रशस्तीपत्र दिले होते, असे चौकशीतून समोर आले.
१ जानेवारी ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कल्पनाच्या खात्यावर ३२ लाख ६८ हजार ८६२ रुपये आले. त्यात अशरफने याने २ लाख ३१ हजार २०० रुपये, सुंदर हरि ऊर्फ सुरेश जैन व अभिजित क्षीरसागर यांनी प्रत्येकी दीड लाख, दत्तात्रय शेटे ७ लाख ८५ हजार, रमेश मुळे २ लाख २५ हजार ५०० रुपये, सुधाकर जाधव १ लाख १८ हजार रुपये, नागेश आष्टीकर १ लाख ४५ हजार रुपये आणि समाधान बहादुरे ९७ हजार ५०० रुपये पाठवल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण नोटिसा बजावूही अद्याप समोर आलेले नाहीत, तर कल्पनानेही आता तपासात सहकार्य करणे सोडून दिल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी कठोर पवित्रा हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

