लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव पोळ, गंगापूर, ढोरकीन व वेरूळ येथील बँक ग्राहक सेवा केंद्रांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या दुकलीला अखेर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईची माहिती सायबर पोलिसांकडून शनिवारी (८ नोव्‍हेंबर) पत्रकारांना देण्यात आली.

नक्की गंडवायचे कसे?
दोन भामट्यांपैकी बँक ग्राहक सेवा केंद्रावर एक जण यायचा. कधी म्हणायचा, मला रोख रकमेची अत्यंत गरज आहे, हॉस्पिटलचे बील भरायचे आहे, लेबर पेमेंट करायचे आहे तर कधी वाहन रस्त्यात नादुरुस्त झाले आहे, असे कारण सांगायचा. माझे नातेवाइक तुमच्या खात्यावर तिकडून ऑनलाइन पैसे पाठवतील. तुमचा क्यूआर कोड किंवा फोन पे नंबर देण्याची विनंती करायचा. तो क्यूआर कोड किंवा फोन पे नंबर त्याच्या साथीदाराला पाठवून पैसे ऑनलाइन मागवून घ्यायचा. खात्यात पैसे जमा झाले, की केंद्रचालक आपले काही कमिशन काढून रोख पैसे देऊन टाकायचा.  त्यानंतर तो व्यक्ती गायब व्हायचा. मात्र थोड्याच वेळात केंद्रचालकाला अनोळखी नंबरवरून कॉल यायचा. तुमच्या बँक खात्यात चुकून रक्कम आली आहे, असे बोलून सायबर टोल फ्री क्रमांक १९३० वर कॉल करून आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करून केंद्रचालकाचे बँक खाते गोठवायचे. केंद्रचालकाची दुहेरी आर्थिक फसवणूक करायचे. केंद्रचालकास पाठविलेल्या रकमेची तक्रार करून ती रक्कम न्यायालयातून परत मिळवायचे.

अखेर केंद्रचालक एकवटले, पोलिसांत धावले...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक बँक ग्राहक सेवा केंद्रचालकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर येऊ लागले. सारेच केंद्रचालक चिंतित होते. त्यांनी एकत्र येत फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी राजू कचरू कुकलारे (रा. रांजणगाव पोळ ता. गंगापूर) यांनी पुढे येऊन सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत भामट्यांचा शोध सुरू केला. ते जळगाव जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत मध्यप्रदेश राज्यात पळून जाताना शिताफीने पाठलाग करून त्यांना वाहनासह पकडण्यात आले.

फसवणुकीचा आकडा लाखोंच्या घरात, आता पैसे परत मिळविण्यासाठी कसून चौकशी...
राहिल युनूस शेख (वय ३७, रा. वडाळा शिवा, नाशिक), प्रविण चंपालाल वैष्णव (वय ४७, रा. सिन्नर, जि. नाशिक) अशी त्यांची नावे समोर आली. त्यांच्या ताब्यातून मारुती स्विफ्ट कारसह एकूण ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी श्रीरामपूर, संगमनेर, जालना, जळगाव, मुक्ताईनगर, देऊळगाव राजा, बुलडाण्यासह मध्यप्रदेशमध्येही अशाप्रकारे अनेकांना गंडवल्याचे समोर आले. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, सहायक फौजदार कैलाश कामठे, पोलीस अंमलदार संतोष तांदळे, मुकेश वाघ यांनी यांनी केला. तपासात सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड, पोलीस अंमलदार दत्ता तरटे, योगेश मोईम, गणेश घोरपडे, सविता जायभाये, योगेश तरमळे, जिवन घोलप, राजेश राठोड, शितल खंडागळे, पूजा म्हस्के यांनी मदत केली. सध्या दोन्ही भामटे पोलीस कोठडीत असून, त्यांनी एकूण किती लाख रुपयांचा गंडा आणि किती केंद्रचालकांना घातला, याची माहिती पोलीस घेत आहेत. अशाप्रकारे कोणत्या केंद्रचालकाची फसवणूक झाली असल्यास संपर्क करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software