चिकलठाण्यातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाण्यातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) दुपारी घडली. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

मूळचे उत्तरप्रदेशातील दाम्‍पत्‍य सध्या चिकलठाण्यात राहते. त्यांना दोन   मुले आहेत. पती-पत्‍नी दोघेही खासगी नोकरी करतात. शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) सकाळी ७ ला महिला नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेली. लहान मुलगा शाळेत गेला होता, तर मोठा मुलगा तब्येत बरी नसल्याने घरीच होता. कामावरून संध्याकाळी साडेपाचला महिला घरी आली असता लहान मुलगा घरी होता. महिलेने भय्या कुठे गेला, असे विचारले असता त्याने सांगितले, की भय्या दुपारी दोनला ट्युशनला जातो, असे सांगून गेला आहे.

त्यानंतर महिलेने घरातील कामे आवरली. संध्याकाळी साडेसहाला मोठा मुलगा ट्युशनमधून येतो. मात्र संध्याकाळचे सात वाजले तरी तो न आल्याने महिलेने त्याच्या ट्युशन क्लासला जाऊन पाहिले असता ट्युशनच्या शिक्षिकेने तो आज ट्युशनलाच आला नव्हता, असे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या महिलेने आजूबाजूला मित्र, नातेवाइकांकडे जाऊन चौकशी केली. मात्र त्यांच्याकडेही तो मिळून आला नाही. त्याचे कोणीतरी अपहरण केल्याची शक्यता महिलेने पोलिसांकडे व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लखनसिंग पाचलोरे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software