जखमीला हॉस्पिटलमध्ये नेताच अपघातग्रस्त दुचाकी चोरट्याने केली गायब!, सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अपघात झाल्यानंतर रिक्षातून जखमीला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. जखमीची अपघातग्रस्त दुचाकी नंतर चोरट्याने गायब केली. त्याचा पडलेला मोबाइलही चोरून नेल्याची घटना सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ घडली आहे. जवाहरनगर पोलिसांनी मंगळवारी (२ डिसेंबर) चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविता राजू गायकवाड (वय ४५, रा. भिमनगर जुना भावसिंगपुरा) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलासाठी त्यांनी मुलगा रोहितसाठी २०२३ मध्ये मोटारसायकल (MH 20 HC 7589) घेतली होती. शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) रात्री पावणेबाराच्या सुमारास रोहित व त्याचा मित्र चंद्रकांत अंकुश काकडे (वय २१, रा. भीमनगर जुना भावसिंगपुरा) हे मोटारसायकलीने चंद्रकांतचा मामा शिवदिप तारक यांना आणण्यासाठी सेव्हन हिल उड्डाणपुलावरून जात असताना अचानक चंद्रकांतकडून मोटारसायकल घसरली आणि रोहित व चंद्रकांत पडले.

रोहितचा मोबाइल त्या ठिकाणी ठिकाणी पडला. चंद्रकांतने रोहितला रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. शनिवारी (२९ नोव्‍हेंबर) सायंकाळी पाचला रोहित आणि चंद्रकांतने अपघातस्थळी जाऊन पाहिले असता मोटारसायकल मिळून आली नाही. ५० हजारांची मोटारसायकल व ३ हजारांचा मोबाइल कुणीतरी चोरून नेल्याची तक्रार सविता गायकवाड यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार हिरा आघाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software