सेव्हन हिल उड्डाणपुलावर भीषण अपघात : ३ वाहने एकमेकांवर धडकली, चिमुकल्याचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील लोडिंग रिक्षाचालकाने ब्रेक दाबले. त्याचवेळी लोडिंग रिक्षामागे असलेल्या दोन कार लोडिंग रिक्षावर आदळल्या. यात एका कारमधील पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सेव्हनहिल उड्डाणपुलावर शनिवारी (२२ नोव्‍हेंबर) दुपारी २:३० वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत या अपघातप्रकरणी कुणाची पोलिसांत तक्रार नव्हती.

मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे कुटुंब बीड जिल्ह्यातील असून, अपघातानंतर त्यांनी तातडीने चिमुकल्याला आकाशवाणीजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने मृतदेह गावाकडे नेला. रात्री ९ च्या सुमारास चिमुकल्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. विशेष म्हणजे, हे सर्व जवाहरनगर पोलिसांना कळवणे गरजेचे होते. खासगी रुग्णालयानेही पोलिसांना माहिती दिली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेने कार सुसाट जात होती.

सेव्हनहिल उड्डाणपूल चढल्यावर पुलाच्या मधोमध त्याने अचानक ब्रेक दाबल्याने मागे असलेली अंड्याची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा चालकानेही (क्र. एमएच २० डीई ४२९८) लगेच ब्रेक दाबले. मात्र लोडिंग रिक्षामागे असलेल्या दोन कार वेगावर नियंत्रण मिळवू शकल्या नाहीत. कार (क्र. एमएच २० एफ यू ३४९८) रिक्षावर आदळली. तिच्या मागे असलेली दुसरी कार (क्र. एमएच ०६ सिएल ९८४६) कारही आधीच्या कारवर आदळली. यात शेवटच्या कारमध्ये समोरच्या सिटवर बसलेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव अभिनव असल्याचे समोर आले. पण सविस्तर माहिती घेण्याचे काम जवाहरनगर पोलीस करत आहेत.

पोलीस घटनास्‍थळी धावले...
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. मात्र ज्‍या कारमध्ये अपघात घडला, ती पसार झाली होती. बाकी तिन्ही वाहने मिळून आली. त्यांचे चालक मात्र निघून गेले होते. पोलिसांनी लोडिंग रिक्षा, दोन्ही कार जप्त करून पोलीस ठाण्यात आणल्या. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणाचीही तक्रार नव्हती. पोलिसांनी काही खासगी रुग्णालय व घाटी रुग्णालयात माहिती घेतली. तिथे कुणीही दाखल नव्हते, असे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software