अंधारात लपून बसला, पोलिसांना पाहताच पळू लागला... शहागंजमध्ये तरुणाला पकडले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अंधारात लपून बसलेला तरुण पोलिसांना पाहून पळू लागल्याने त्याला सिटी चौक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरी किंवा घरफोडीच्या उद्देशाने त्याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुरुवारी (१३ नोव्‍हेंबर) रात्री पावणेनऊला ही कारवाई करण्यात आली.

अरबाज खान मोहम्मद खान (वय २४, रा. चाऊस कॉलनी, हिमायतनगर, छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध  विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर त्रिभुवन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार मुनिर पठाण, पोलीस अंमलदार प्रविण टेकले आणि मनोहर त्रिभुवन हे सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. शहागंजच्या गांधी पुतळ्याजवळ आले असता रात्री पावणेनऊच्या सुमारास अरबाज हा गांधी पुतळ्यामागे दुकान बंद असलेल्या शटरजवळ अंधारात संशयितरित्या हालचाली करताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी गाड्या थांबवून त्याच्याकडे धाव घेतली असता तो पळून जाऊ लागला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिले. अधिक तपास पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर फुके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!

Latest News

शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार! शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २५ वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच असलेल्या शहर पाणी योजनेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१९ मार्च) दखलपात्र प्रगती...
अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..!, पठाण म्हणाले, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही... 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software