एमजीएम हॉस्पिटलमध्ये नर्स-सुरक्षारक्षक महिलेत मारामारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉस्पिटलमध्ये जाण्यास रोखल्यामुळे नर्स आणि सुरक्षा रक्षक महिलेत जोरदार मारामारी झाली. नर्स महिलेने तिच्या बहिणीसह मिळून सुरक्षारक्षक महिलेचे डोके फोडून जखमी केले. ही घटना सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी १ च्या सुमारास घडली. या प्रकरणी आज, ९ डिसेंबरला सिडको पोलिसांनी नर्स महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजश्री सुधाकर बोईने (वय ३७,रा. कैलासनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर सध्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या ७ वर्षांपासून एमजीएममध्ये सुरक्षारक्षक आहेत. सोमवारी (८ डिसेंबर) त्या वॉचमन बोर्डे व सुपरवायझर रामनाथ सेलार यांच्यासह आऊट गेटवर ड्युटीला होत्या. दुपारी एकच्या सुमारास एमजीएम हॉस्पिटलच्या नर्स सपना खंडारे व त्यांची बहीण व तिचा नवरा असे तिघे गेटजवळ आले. त्यांना राजश्री यांनी रोखले. पेशंटला भेटायचे असल्यास पास दाखवा, असे म्हटले.

त्यावर सपना खंडारे यांनी राजश्री यांना तू मला ओळखत नाही का, असे म्हणून केसांना पकडले व बहिणीसह मिळून हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन डोके पकडून फरशीवर आपटले. यात राजश्री या जखमी झाल्या. सपनाचा पतीही मारहाण करण्यास सांगत होता. तिघांनी संगनमत करून डोके फोडले व छातीला व डावा हात, उजवा हात व चेहऱ्यावर मारून जखमी केले. भांडणात राजश्री यांची गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मैत्रिणीच्या १७ वर्षीय मुलीला युवकाने फूस लावून पळवले !; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Latest News

मैत्रिणीच्या १७ वर्षीय मुलीला युवकाने फूस लावून पळवले !; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ मैत्रिणीच्या १७ वर्षीय मुलीला युवकाने फूस लावून पळवले !; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मैत्रिणीच्या १७ वर्षीय मुलीवरच युवकाची नजर फिरली. मैत्रिणीपासून वेगळे राहणे सुरू केल्यावर त्याने तिच्या...
रेल्वे भरतीच्या ऑनलाइन परीक्षेत कॉपी करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडले, छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार
अदिती, नजमाने रचलेल्या कारस्थानात पुरता अडकला दिलीपकुमार!, पैसे गेले, मुलगी गेली, हाती राहिले रेल्वेचे तिकीट...छत्रपती संभाजीनगरात घडली ही धक्कादायक घटना...
छत्रपती संभाजीनगरात तोतया पोलीस पुन्हा अवतरले!, दोघांना लुटले...
बजाजनगर, खुलताबादमध्ये आत्महत्येच्या घटना, २ युवकांनी का कवटाळले असेल मरण?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software