आयशरने अचानक ब्रेक मारल्याने मालवाहू वाहन मागून धडकले, दोघे जखमी, वाळूजजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समोर धावणाऱ्या आयशर वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने किराणा माल घेऊन जाणारे मालवाहू वाहनातील चालक-क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, २४ डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

WhatsAppImage2025-12-24at5.51.23PM

चालक नावेद खान (वय ३८, रा. वाळूज) व क्लिनर जुनैद वाजीद शेख (वय १७ रा. वाळूज) अशी जखमींची नावे आहेत. ते पंढरपूरवरून किराणा माल घेऊन वाळूजकडे येत होते. बकवालनगर ते वाळूज दरम्यान समोर धावणाऱ्या आयशर वाहनाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे खान यांचे मालवाहू वाहन त्याला मागून धडकले. अपघात होताच समोरील आयशर पळून गेले. मालवाहू वाहनाची चालक केबीन पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली.  त्यात चालक खान केबीनमध्ये अडकून पडला. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाळूज येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामुळे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवून अपघातग्रस्त मालवाहू वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गोपाल पुरभे, पोलीस हवालदार अरुण फोलाने, मच्छिंद्र जाधव आदींनी परिश्रम घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software