कामानिमित्त पती-पत्नी घराबाहेर, घराची जबाबदारी २ मोलकरणींवर, ४ लाखांचे सोने झाले गायब!; सुरणानगरात काय घडलं ?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरणानगरात एक मोठी चोरी समोर आली आहे. घरातून ४ लाखांचे सोने गायब आले आहेत. पती-पत्‍नी घरातून कामासाठी बाहेर पडले, की २ मोलकरणींवर घराची जबाबदार होती. त्यामुळे संशय या मोलकरणींवर आला आहे. या प्रकरणात जिन्सी पोलिसांनी मंगळवारी (२ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

रुपाली अमोल बाटिया (वय ३६, रा. सुरणानगर श्रीनिवास अपार्टमेंट) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या व्यंकटेशनर येथे कुकींगचे खासगी क्लासेस घेतात. त्यांच्या पतीचे मोंढ्यामध्ये पान मसाल्याचे होलसेल किराणा दुकान आहे. ते सकाळी १० ला किराणा दुकानात जातात. रात्री ९ ला घरी येतात. सकाळी साडेदहाला रुपाली या क्लाससाठी जातात. सं‌ध्याकाळी साडेसहाला घरी येतात. या दरम्यान घरी कोणी नसल्याने घरातील कामे करण्यासाठी दोन महिला मागील नऊ महिन्यांपासून त्यांनी कामासाठी लावल्या होत्या. सविता घोरपडे (वय ४०, रा. बायजीपुरा) व सुनिता सोनवणे (वय ४५, रा. बायजीपुरा) अशी त्यांची नावे आहेत. त्या घर उघडून काम करून जायच्या.

घरात वडिलोपार्जीत तसेच लग्नातील असे एकूण अंदाजे १० तोळे सोने होते. ते रुपाली यांनी पत्र्याच्या कपाटामध्ये लॉकरमध्ये ठेवले होते. १७ नोव्‍हेंबरला रुपाली यांनी कपाटातील लॉकर पाहिले असता दागिने दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी सासूला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, १० दिवसांपूर्वी दागिणे तेथेच होते. त्यानंतर रुपाली यांनी घरात इतरत्र सगळीकडे शोध घेतला. मात्र दागिणे मिळाले नाहीत. त्यामुळे रुपाली यांनी दोन्ही कामवाल्या बाईंना बोलावून विचारपूस केली. मात्र त्यांनीही दागिण्यांबाबत काही माहिती दिली नाही. घरातील दागिने चोरून नेल्याचा संशय तक्रारीत घरात काम करणाऱ्या महिलांवर व्यक्त करण्यात आला आहे. १ लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या दोन तोळ्यांच्या, १ लाख २० हजार रुपयांचा सोन्याचे नेकलेस ३ तोळ्यांचा,  ६० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दीड तोळ्याचे, १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची चैन ३ तोळ्यांची असे ४ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software