रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्येने छत्रपती संभाजीनगर हादरले!; कारने पाठलाग करत अडवले, धारदार शस्त्राचे सपासप वार...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पाठलाग करत असलेल्या कारने पुढे येऊन रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा मारेकरी उतरले. त्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत रिक्षाचालकाची हत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली सिल्क मिल कॉलनीजवळ बुधवारी (१ ऑक्‍टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. रिक्षाचालक इम्रान सय्यद शफिक सय्यद (वय ३८, रा. सादातनगर) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. गॅस व्यवसायाच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांना संशय पडेगावच्या मुजीब डॉन नावाच्या गुन्हेगारावर आहे.

इम्रान बुधवारी सायंकाळी त्याच्या चार व दहा वर्षांच्या मुलांना घेऊन रिक्षाने बाहेर गेला होता. रात्री साडेआठला घरी परतत असताना रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली अचानक मागून आलेल्या कारने त्याची रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा मारेकरी उतरले. त्यांनी आधी इम्रानच्या मुलांना रिक्षाबाहेर काढले. नंतर सीटवर बसलेल्या इम्रानवर धारदार शस्त्राचे सपासप वार सुरू केले. इम्रानने शस्त्र पकडण्याचा प्रयत्न केला असता मारेकऱ्यांनी त्याचे उजवे मनगट कापून मान व डोक्यावर खोल वार केले. यात प्रचंड रक्तस्राव झाला.

रक्तबंबाळ इम्रान जागीच मृत्युमुखी पडला. रिक्षातून रक्ताचे पाट वाहत होते. हत्या होत असताना चिमुकली मुले, अब्बू अब्बू असा आक्रोश करत होते. मारेकरी बीड बायपासच्या दिशेने पळून गेल्यानंतर घटनास्‍थळी मोठा जमाव जमला. हत्येची माहिती कळताच पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे, नंदकुमार भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. इम्रानला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.

गॅस व्यवसायावरून सय्यद मुजीब डॉनच्या कुटुंबासोबत इम्रानचे वाद होते, असे चौकशीत समोर येत आहे. मुजीबचा पडेगावमध्ये गॅसचा व्यवसाय आहे. यातून दोन्ही कुटुंबात ३१ मे रोजीही तुंबळ हाणामारी झाली होती. मुजीब डॉनच्या डोक्यात गंभीर वार झाले होते. अनेक दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. छावणी पोलिसांनी इम्रान, त्याचा भाऊ सलमान सय्यद शफिक सय्यद आणि आवेश खान अमजत खान यांना अटकही केली होती. तिघे महिनाभरापूर्वी जामिनावर सुटले होते, तर मुजीबलाही सशर्त अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यामुळे इम्रानच्या हत्येला त्या वादाची किनार असल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software