रेल्वे भरतीच्या ऑनलाइन परीक्षेत कॉपी करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडले, छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या ऑनलाइन परीक्षेत एक उमेदवार कॉपी करताना मिळून आला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसीतील परीक्षा केंद्रावर घडला.

राहुल राजाराम जंगाळे (वय २५, रा. मुंबापूरवाडी, कसाबखेडाजवळ, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे कॉपीबहाद्दराचे नाव आहे. कृष्णा विष्णू घोडके (वय २८, रा. पाचोड एकोड ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते चिकलठाणा एमआयडीसीतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये दीड वर्षापासून नोकरी करतात. मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी ९ ते साडेदहा या वेळेत चिकलठाणा एमआयडीसीतील आयओएन डिजिटल झोन परीक्षा केंद्रात आरआरबी (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) ग्रुप डी -सीबीटी ही ऑनलाइन परीक्षा होती. पी. नागाफनेंद्र कुमार यांना रेल्वे विभागातर्फे असिस्टंट सेंटर को-ऑर्डिनेटर म्हणून नेमलेले होते.

सकाळी ९ ला परीक्षार्थींना तपासून परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले होते. परीक्षार्थी परीक्षा देत असताना पी. नागाफनेंद्र कुमार हे सर्व परीक्षा हॉलमध्ये राउंड मारत असताना त्यांना साडेनऊच्या सुमारास पहिला मजल्यावरील हॉलमधील राहुल जंगाळे हा परीक्षार्थी त्याच्या हातातील पिवळ्या चिठ्ठीवर बघून परीक्षेचे उत्तर देत असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या हातातील चिठ्ठी पाहिली असता त्यावर आकडे लिहलेले आढळले. तो कॉपी करताना मिळून आल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पंडीत चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software