इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून २२ वर्षीय तरुणीला त्रास द्यायचा, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणीला इन्स्टाग्रामवर सतत मेसेज करून अश्लील शिवीगाळ, धमक्या देणाऱ्या माथेफिरू तरुणाला छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद उजैब मोहम्मद अझहर (रा. गरम पाणी, छत्रपती संभाजीनगर) असे या माथेफिरूचे नाव आहे.

तक्रारदार तरुणी खासगी नोकरी करते. तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर झारा खान नावाच्या आयडीवरून नोव्हेंबर २०२५ पासून वारंवार अश्लील मेसेज येत होते. समोरील व्यक्ती शिवीगाळ करत होती. धमक्या देत होती. त्यामुळे तरुणी त्रस्त झाली होती. तिने इन्स्टाग्रामवर त्याला ब्लॉक केले तरी तो वेगवेगळ्या मार्गाने संपर्क करून त्रास देतच होता. अखेर तरुणीने छत्रपती संभाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास केला. इन्स्टाग्राम आयडी मोहम्मद उजैबने तयार केल्याचे निष्पन्न झाले. सोशल मीडियाचा गैरवापर करून त्याने तरुणीची बदनामी करण्याचा आणि पाठलाग करून त्रास दिल्याचेही तपासात समोर आले.

त्याच्याविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तातडीने मुसक्या आवळल्या आहेत. अधिक तपास जिन्सी पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलीस अंमलदार राहुल काळे, अमोल सोनटक्के, संदीप पाटील, महिला पोलीस अंमलदार हर्षा मेहता यांनी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा छळ, धमकी अथवा बदनामी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software