- News
- सिटी क्राईम
- दोन्ही मातब्बर राजकीय नेते : माजी जिल्हा परिषद सदस्याने भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून केला राडा, श...
दोन्ही मातब्बर राजकीय नेते : माजी जिल्हा परिषद सदस्याने भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून केला राडा, शहानूरवाडीतील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रस्थापित राजकीय घराण्याशी संबंधित, जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्यामसुंदर वसंतराव उढाण (वय ४७, रा. गुरुसहानीनगर, सिडको एन-४) यांनी चाकूने भाजप पदाधिकारी सतीश जगन्नाथराव घाटगे (वय ५२) यांच्या घरात घुसून बुधवारी (७ जानेवारी) पहाटे राडा केला. शहानूरवाडीच्या केशवनगरीत ही घटना घडली. चाकूने धमकावत सामानाची नासधूस करत कारची तोडफोड केल्याचे घाटगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून जवाहरनगर पोलिसांनी उढाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घाटगे हे घृष्णेश्वर साखर कारखाना व घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन असून, २०२४ मध्ये त्यांनी बंडखोरी करून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले. एका आमदाराचे नातलग असलेले श्यामसुंदर उढाण हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांच्या पत्नीने जिल्हा परिषद अध्यक्षपदही भूषवले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 10:39:01
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

