हालचलाखीने एटीएमची अदलाबदल करून कामगाराला गंडा!; सुतगिरणी चौकातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : हालचलाखीने एटीएमची अदलाबदल करून भामट्याने गवंडी कामगाराला चांगलाच दणका दिला. त्‍याच्या खात्‍यातून १९ हजार रुपये काढून घेतले. ही घटना सुतगिरणी चौकातील एसबीआयच्या एटीएम केंद्रात घडली. सोमवारी (२९ सप्‍टेंबर) जवाहरनगर पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

छगन प्रभाकर गायकवाड (वय ३२, रा. काबरानगर गारखेडा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते गवंडीकाम करतात. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास ते सुतगिरणी चौकातील SBI बँकेच्या ATM मध्ये पत्नी सुमित्रा यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आले. एटीएममधून पैसे काढता येत नसल्यामुळे एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे ATM घेतले. दोन वेळेस १० -१० हजार रुपये काढून दिले. नंतर नकळत हातचालाखीने दुसरेच एटीएम कार्ड गायकवाड यांना देत अदलाबदली केली. नंतर शुक्रवारी संध्याकाळी सहापासून शनिवारी सकाळी ८ पर्यंत त्‍याने खात्‍यातून १९ हजार ५०० रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात येताच गायकवाड यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार हिरा आघाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software