- News
- सिटी क्राईम
- follow up : १९ वर्षीय तरुणाचा खून करणारे तिन्ही क्रूरकर्मे गजाआड!, हर्सूल भागातील भीमटेकडीवर घडवले ह...
follow up : १९ वर्षीय तरुणाचा खून करणारे तिन्ही क्रूरकर्मे गजाआड!, हर्सूल भागातील भीमटेकडीवर घडवले होते क्रूर हत्याकांड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल परिसरातील भीमटेकडीवर १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या ३ क्रूरकर्म्यांना अटक करण्यात हर्सूल पोलिसांना यश आले. त्यांचा चौथा साथीदार अद्याप फरारी आहे. हत्या करताना लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करून पाय तोडल्यानंतर चाकूने सपासप वार करत कौर्याची परीसीमा गाठली होती. तरुणाने बुधवारी (७ जानेवारी) दुपारी दीडला घाटी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला होता. त्यानंतर हर्सूल पोलिसांनी चौघा मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता.
पाठीवर काहीतरी धारदार वस्तूने मारून जखमी केले. नंतर मकई गेटजवळ आणून टाकले व मोटारसायकलस्वार पळून गेले. अनिकेतचा मोबाइलही घेऊन गेले. ३ जानेवारीला पोलिसांनी पोलीस आयुक्त कार्यालय आणि डीकेएमएम कॉलेज येथील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता डीकेएमएम कॉलेजच्या फूटेजमध्ये एका मोटारसायकलवर एक अनोळखी व्यक्ती ज्याने तोंडाला बांधलेले होते, तो अनिकेतला शर्ट व बनियन नसलेल्या अवस्थेत मागे बसवून मकबऱ्याकडे घेऊन जात असल्याचे दिसले. ४ जानेवारीला दुपारी १२ ला अण्णा राऊत हे अनिकेतजवळ असताना त्याने सांगितले, की एक टकला व्यक्ती होता, ज्याला इतर तिघे भैय्या म्हणत होते. हमारे आंटी को छेडता है क्या? असे म्हणून भैय्या नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉडने डाव्या पायावर मारले व इतर तिघांनी चाकूने तसेच हाताचापटांनी मारहाण केली. अनिकेतने मोबाइल फोन घेऊन त्यात इन्स्टाग्राम ओपन करून त्यावर दोन व्यक्तींचा फोटो दाखविला. त्यापैकी एकाचे नाव संकेत गायकवाड असे असल्याचे तसेच फोटोतील दुसऱ्या व्यक्तींची नावे माहीत नसल्याचे सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वाती केदार करत आहेत. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

