दोन वर्षे उपभोग घेऊन प्रेग्‍नंट केले, मग जातीचे कारण देत म्हणाला घरचे स्वीकारणार नाहीत!; २० वर्षीय प्रेयसीच्या तक्रारीवरून २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, पडेगावची घटना

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : प्रेमात पाडून २ वर्षे शारीरिक उपभोग घेत २५ वर्षीय तरुणाने २० वर्षीय तरुणीला प्रेग्‍नंट केले. मात्र ती अनुसूचित जातीची असल्याने माझ्या घरचे स्वीकारणार नाहीत, असे म्हणून तिला लग्न करण्याऐवजी सोडून दिले. तिने रविवारी (१२ ऑक्‍टोबर) घाटी रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी प्रियकर सागर दिलीप बेलकर (वय २५, रा. पडेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तरुणीच्या तक्रारीनुसार, २ वर्षांपूर्वी तरुणी आणि सागरची ओळख झाली होती. ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. मात्र लग्नाचा विषय काढला की टाळू लागला. तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी हट्ट केला असता तू अनुसूचित जातीची असल्याने माझे कुटुंब स्वीकारणार नाही. मी त्यांना काहीच सांगू शकत नाही. मी आत्महत्या करतो, अशी धमकी सागरने तरुणीला दिली. त्यामुळे तरुणी घाबरून गेली.

सागरपासून ती प्रेग्नंट राहिली होती. रविवारी पहाटे तिला प्रसुती कळा सुरू झाल्याने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी तिने मुलीला जन्म दिला. तिने सागरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर तरुणीने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रभारी ठाणेदार डॉ. विवेक जाधव यांनी तक्रार गांभीर्याने घेत तत्काळ गुन्हा दाखल करत सागरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software