चंपा चौकात बलात्काराचा आरोपी पकडला, क्षणात शेकडोंचा जमाव जमला, दबावाखाली न येताच पोलिसांनी पायीच ठाण्यापर्यंत काढली धिंड!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सोहेल अब्दुल रज्जाक कादरी (वय २७, रा. विश्रांतीनगर) याला पोलिसांनी चंपा चौकात खासगी हॉस्पिटलसमोर पकडले. त्याने पोलिसांना अरेरावी सुरू केली. शेकडोंचा जमाव जमला. मात्र तरीही पोलिसांनी दबावाखाली न येता त्याला गाडीत बसविण्याचा प्रयत्‍न केला. त्याने गाडीत बसण्यास नकार दिल्यानंतर अखेर जमावातूनच मार्ग काढत पोलिसांनी पायीच पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. पोलिसांचे रौद्ररुप पाहून जमावही स्तब्ध झाला होता. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (२५ नोव्‍हेंबर) सायंकाळी घडला.

जमलेला जमाव, निर्माण झालेला तणाव या परिस्थितीतही पोलिसांनी आरोपीला न सोडता कायद्याची बूज राखल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मे २०२४ मध्ये अल्पवयीन मुलगी रागाच्या भरात घर सोडून मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर बसलेली होती. सोहेल या रेल्वेस्थानकावर पाणी विक्रीचे काम करायचा. मुलीला पाहून सोहेलने तिला मदतीचे आमिष दाखवून एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्यावर तीन दिवस बलात्कार केला. नंतर बहिणीच्या घरी नेऊन तिच्या धर्मांतराचा प्रयत्न केला. मात्र मुलीने विरोध सुरू केल्याने त्याने तिला धमकावत सिडको बसस्थानकावर सोडून पळ काढला होता.

सोहेल विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला नियमित तपासणीसाठी ८ फेब्रुवारी २०२५ ला घाटी रुग्णालयात नेले असता पोलिसांच्या हाताला झटका मारून तो पसार झाला होता. तो मुंबईला गेला. तिथे एका चिकनच्या दुकानात काम करता होता. पळून गेल्याचाही गुन्हा त्‍याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मंगळवारी त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी तो शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांनी सहकारी संदीप तायडे, कैलास काकड, विजय निकम, बाळू नागरे यांच्यासह सायंकाळी चंपा चौकात धाव घेतली.

खासगी हॉस्पिटलबाहेरच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्‍हणजे, आपल्याला ओळखता येऊ नये म्हणून सोहेलने केस वाढवले होते. मात्र तरीही पोलिसांनी त्याला ओळखलेच. पकडले जाताच सोहेलने पोलिसांना अरेरावी सुरू करत धिंगाणा घालू लागला. काही वेळातच तिथे शेकडोंचा जमाव जमल्याने त्याचा आत्मविश्वास वाढून त्याने पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. गाडीत बसण्यासही नकार देऊ लागला. जमाव मोठा असल्याने पोलिसांवर दबाव येऊ लागला. मात्र त्याही परिस्थितीत दबावाला न जुमानता पोलिसांनी जमावातूनच वाट काढत पायीच पोलीस ठाण्यात नेले. त्याला बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पत्रकारांना दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software