रेल्वेस्टेशनवर चोरट्यांची टोळी, प्रवाशांना मारहाण मोबाइल लुटून न्यायचे...एकाला अटक, तिघांचा शोध सुरू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना मारहाण करत मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एकाला अटक केली असून, त्‍याचे ३ साथीदार फरारी आहेत. वेदांतनगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुकेश विरेंद्र टेंभरे (वय २९, रा. कवडगाव, बिडकीन ता. पैठण, मूळ रा. मध्यप्रदेश) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो बिडकीनच्या खासगी कंपनीत नोकरी करतो. रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने तो मूळगावी किणी (ता. खैरलांजी जि. बालाघाट, मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर आला होता. रेल्वेस्टेशनबाहेरील सार्वजनिक मुत्रीघरात लघुशंका करून बाहेर आला एक लाल टी शर्ट घातलेला व दुसरा काळा टी शर्ट घातलेला असे दोन युवक त्याच्याकडे आले. त्यांनी मुकेशला धक्का मारून हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून घेत तोंडावर चापटबुक्क्यांनी मारून ढकलून देत पळून गेले.

मुकेशने आरडाओरड केली असता लोक जमले. मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. मुकेशने तक्रार देण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले असता तिथे त्याच्यासारखीच लूट झालेला मनोजकुमार कैवातिया हाही तक्रार देण्यासाठी आला होता. त्याचाही मोबाइल अशाच पद्धतीने चोरट्यांनी मारहाण करून हिसकावून पळ काढला होता. मुकेशची तक्रार घेणे सुरू असतानाच पोलीस अंमलदार महाशंख दांडगे हे एक लाल शर्ट घातलेला चोरटा वेदांतनगर पोलीस ठाण्यात घेऊन आले. सय्यद स‌द्दाम सय्यद हमीद (वय २५, रा. सादातनगर गल्ली नं.१३ छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.

त्याने त्याचे साथीदार शेख वाहेद शेख खाजा उर्फ बबलू (वय ३६, गल्ली नं. १० सादातनगर) व शेख मज्जीद (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सादातनगर), छोटा कालू उर्फ नईम शेख चाँद (वय २५, रा. सादातनगर) यांच्या मदतीने प्रवाशांचे मोबाइल चोरण्याचे गुन्हे केले. चोरलेले मोबइल त्याने साथीदार शेख वाहेद शेख खाजा उर्फ बबलू याच्याकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले. मुकेशचा मोबाइल ९ हजार रुपयांचा तर मनोजकुमार कैवातिया (वय २५, रा. पिसीद ता. कसडोल जि. बलोदाबाजार भाटापारा राज्य छत्तीसगड ह. मु. प्रतानगरनगर गोलवाडी छत्रपती संभाजीनगर) याचा १५ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार जोशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software