गल्ल्यातील रक्कम घेऊन परतणाऱ्या व्यावसायिकाला अंधारात लुटले, ३ तासांत पोलिसांनी तिन्ही लुटारूंच्या मुसक्या आवळल्या!, सातारा परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कामगारानेच टीप दिली अन्‌ ३ लुटारूंनी व्यावसायिकाला अंधारात गाठून लुटले. आरडाओरड ऐकून नागरिक जमल्याने लुटारूंनी दुचाकी सोडून पळ काढला. नंतर या दुचाकीच्या चेसीस क्रमांकावरून तपास करत शहर गुन्हे शाखेने तिन्ही लुटारूंच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी (३ डिसेंबर) रात्री ९:३० वाजता सातारा परिसरात ही घटना घडली.

दीपक रमेश कांबळे (वय २०), आकाश प्रकाश बोर्डे (वय २२, दोघे रा. इंदिरानगर, गारखेडा) आणि कृष्णा ऊर्फ बाबू बुधराम यादव (वय १८, रा. नवनाथनगर) अशी पकडण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध व्यावसायिक मुरजी खिमजी नोर (वय ४२, रा. छत्रपतीनगर, बीड बायपास) यांनी तक्रार दिली. नोर यांचे बीडबायपासवर स्टेशनरीचे दुकान आहे. बुधवारी रात्री सव्वानऊला दुकान बंद करून दुकानातील रोख रक्कम घेऊन ते दुचाकीने घरी निघाले. गोदावरी टी-पॉईंट ओलांडताच अंधारात त्यांना तिघांनी अडवले. त्यांच्या चेहऱ्याला रुमाल बांधलेले होते. नोर यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावली.

लुटण्याआधी तिघांनी दुचाकी अंधारात लावली होती. नोर यांनी आरडओरड केल्याने नागरिक धावून आले. त्यामुळे दुचाकीकडे जाण्याऐवजी लुटारूंनी पळ काढला. माहिती मिळताच घटनास्‍थळी आलेल्या पोलिसांना विनाक्रमांकाची दुचाकी मिळाली. नोंदणीकृत मोबाइलवर कॉल केला असता त्याच्या आईने उचलला. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याचे घर गाठले आणि अर्ध्या तासात मग तिघांचीही ओळख पटून त्यांच्या मुसक्या आवळल्या. लुटारू दीपक कांबळेच्या संपर्कातील तरुण हा नोर यांच्या दुकानात कामाला आहे. काही दिवसांपूर्वी नोर यांच्याशी त्याचे खटके उडाले होते. त्यानेच कांबळेला नोर यांची टीप दिल्याचा संशय आहे. कृष्णा यादवविरुद्ध यापूर्वी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दुचाकी आणि लुटलेले पैसे पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, पोलीस अंमलदार मनोहर गिते, योगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, शोन पवार याच्या पथकाने केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई

Latest News

ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला कन्नड तालुक्यातील नागदजवळील महादेव...
असेही खंडणीखोर... मजुराचे अपहरण करून मागितली १५ हजारांची खंडणी!; २४ तासांतही जेरबंदही झाले!! वैजापुरातील घटनेची राज्यभर चर्चा
मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software