हर्सूल तलावात बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : २५ वर्षीय तरुणाचा हर्सूल तलावात बुडून मृत्‍यू झाल्याची घटना आज, २१ ऑक्‍टोबरला सकाळी १० च्या सुमारास समोर आली. रोहित अनिल बनकर (रा. एकतानगर, जटवाडा रोड, हर्सूल परिसर) असे मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित तलावात पडल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकाने अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ड्युटी इन्चार्ज दीपराज गंगावणे,  जवान संग्राम मोरे, छत्रपती केकान, मतीन शेख, लव घुगे, चंद्रसेन गीते, सचिन फुले, शिवसंबा कल्याणकर यांनी तत्‍काळ घटनास्थळी धाव घेऊन तलावात शोध मोहीम राबवली. तासभरानंतर रोहितचा मृतदेह हाती लागला. त्‍याला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  हर्सूल पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, रोहितने आत्‍महत्‍या केली की अपघाताने तलावात पडला, याचा तपास सुरू केला आहे. त्याचे वडील मातीकाम करतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software