संतापजनक… ८ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्‍य करून नराधम जे बोलला ते वाचूनच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल…, गुलमंडीवरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पालक, पोलीस कितीही सतर्क राहिले तरी नराधमांचे कृत्‍य सुरूच आहेत. एका नराधमाने हद्दच केली, ८ वर्षीय मुलीच्या डोक्‍यावरून हात फिरवून त्याने पप्पी घेतली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी हादरून गेली व रडू लागली. तिने आई-वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तरुणाला जाब विचारला असता निर्लज्‍जपणे नराधम म्हणाला, मला लहान मुली आवडतात.. मी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पालक, पोलीस कितीही सतर्क राहिले तरी नराधमांचे कृत्‍य सुरूच आहेत. एका नराधमाने हद्दच केली, ८ वर्षीय मुलीच्या डोक्‍यावरून हात फिरवून त्याने पप्पी घेतली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी हादरून गेली व रडू लागली. तिने आई-वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तरुणाला जाब विचारला असता निर्लज्‍जपणे नराधम म्हणाला, मला लहान मुली आवडतात.. मी इथला दादा आहे, तू मला ओळखत नाहीस… असे म्हणून त्याने चिमुकलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुलमंडीवरील एका मिठाई दुकानासमोर गुरुवारी (१३ सप्‍टेंबर) रात्री ९ च्या सुमारास घडली. सिटी चौक पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दोघा नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संतोष मगरे व सचिन साबळे (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) अशी दोघा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनिषा हिवराळे यांनी सांगितले. घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे, की ८ वर्षीय मुलगी आई-वडिलांसोबत गुलमंडी परिसरात आली होती. एका मिठाईच्या दुकानात मिठाई खरेदी करण्यासाठी ते गेले असता तिथे अनोळखी तरुणाने तिच्या डोक्‍यावर हात फिरवून पप्पी घेतली. त्यामुळे मुलगी घाबरली व रडू लागली. मुलीच्या आई- वडिलांनी तरुणाला याचा जाब विचारला. त्यावर निर्लज्‍जपणे तरुण म्हणाला, की मला लहान मुली आवडतात. त्याचवेळी त्याचा साथीदारही तिथे आला. त्याने मी दादा आहे इथला. तू मला ओळखत नाहीस, असे बोलून मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीला घेऊन दाम्पत्याने सिटी चौक पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software