- News
- सिटी क्राईम
- संतापजनक… सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर घरातच वारंवार बलात्कार; ८ महिन्यांची प्रेग्नंट राहिल्या...
संतापजनक… सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर घरातच वारंवार बलात्कार; ८ महिन्यांची प्रेग्नंट राहिल्याने बिंग फुटले, उस्मानपुऱ्यातील घटना!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यातून मुलगी आठ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील पीरबाजार भागात समोर आली आहे. कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला घरातून हाकलून देईल, अशी धमकी ४५ वर्षीय नराधम मुलीला देत होता. उस्मानपुरा पोलिसांनी बलात्कार, पोक्सोसह अन्य कलमानुसार उस्मानपुरा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यातून मुलगी आठ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील पीरबाजार भागात समोर आली आहे. कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला घरातून हाकलून देईल, अशी धमकी ४५ वर्षीय नराधम मुलीला देत होता. उस्मानपुरा पोलिसांनी बलात्कार, पोक्सोसह अन्य कलमानुसार उस्मानपुरा गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे.
औरंगपुऱ्यात लग्नाच्या आमिषाने तरुणीवर ४ वर्षे बलात्कार…
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर २६ वर्षीय तरुणाने ४ वर्षे बलात्कार केला. नंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने छावणी पोलीस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध तक्रार दिली. हा प्रकार २०२१ ते मे २०२४ या काळात घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. औरंगपुऱ्यातील मृणाल पॅलेस लॉजमध्ये नेऊन तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. अतुल संजय कीर्तिकर (वय २६, रा. भीमनगर भावसिंगपुरा) असे संशयित तरुणाचे नाव आहे. छावणी पोलिसांनी अतुलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

प्रवासी विद्यार्थिनीसमोर पँट काढूल अश्लील कृत्य करणारा नराधम रिक्षाचालक अटकेत
रिक्षाचालकाने १७ वर्षीय विद्यार्थिनीसमोर धावत्या रिक्षात पॅण्ट काढून अश्लील चाळे केले केल्याची घटना २३ ऑगस्टला शहरात समोर आली होती. वेदांतनगर पोलिसांनी विकृत रिक्षाचालक समीर बाबा पठाण (वय ३०, रा. सईदा कॉलनी) याला गुरुवारी (२९ ऑगस्ट) अटक केली आहे. पीडित मुलगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकते. ती वाळूजची असून, वाळूजवरून महावीर चौक व तेथून दुसऱ्या रिक्षाने महाविद्यालयात ये-जा करते. २३ ऑगस्टला महावीर चौकात उतरून समीरच्या रिक्षात बसली. समीरने तिच्यासोबत संवाद साधला. नंतर रिक्षा रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना अचानक पँट खाली करून अश्लील कृत्य केले. मुलीने आरडाओरड सुरू केल्याने त्याने रिक्षा थांबवली. मुलगी उतरलाच त्याने पळ काढला.
मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो पसार झाला. रोजाबाग येथील घर सोडून बेगमपुऱ्यात सईदा कॉलनीत त्याने भाड्याने घर घेतले. मात्र शहरात न थांबता नाशिक, मालेगाव, खुलताबाद, हर्सूल, सिटी चौकातील नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. गुरुवारी ओव्हरगावात आला. ही बाब कळताच पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी ओव्हरगावातून त्याला अटक केली. कारवाईत पोलीस अंमलदार बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, रंजूसिंग सुलाने, प्रवीण मुळे यांनी भाग घेतला.
विशेष म्हणजे, २५ जून रोजी लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेवर परधर्मातील तरुणासोबत बोलत असल्याच्या संशयावरून मुलीवर पाळत ठेवून तरुण, तरुणीला टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यात मारहाण करणाऱ्या टोळक्यात समीरचा सहभाग होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. १८ दिवस कारागृहात राहून जामिनावर बाहेर आल्यावर त्याने ही विकृती केली. विशेष म्हणजे, सध्या लव्ह जिहादमुळे चर्चेत आलेल्या ओव्हरगावात तो नातेवाइकाकडे लपला. त्यामुळे लव्ह जिहादच्या या घटनांची पाळेमुळे खोदण्याची गरज निर्माण झाली आहे.
५० वर्षीय दिनकरला म्हणे प्रेम झाले….
पंचशीलनगर भागात ५० वर्षीय दिनकर निकमला उतारवयात प्रेम झाले. त्याने महिलेला मैत्रीसाठी धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी (२७ ऑगस्ट) घडली. मला तू आवडतेस, माझ्यासोबत राहा. तू मला बोलली नाहीस, तर मी तुझ्या घरासमोर विष पिऊन आत्महत्या करीन, अशी धमकी त्याने चक्क महिलेला दिली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात महिलेने धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांन दिनकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.
सिल्लोडमध्ये विनयभंगाच्या दोन घटना
पहिल्या घटनेत सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ येथे ४५ वर्षीय विवाहितेसोबत घरात घुसून ज्ञानेश्वर लक्ष्मण बावस्कर (रा. धावडा) याने अश्लील चाळे केले. त्याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर आणि पीडित महिलेच्या पतीचा पैशांचा व्यवहार होता. तिचा पती घरात नसताना ज्ञानेश्वर घरात घुसला. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत अश्लील चाळे केले. महिलेने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वरविरुद्ध तक्रार दिली. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
दुसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे ३५ वर्षीय महिलेसोबत घरात घुसून बाजीराव किसन मोरे (रा. शिंदेफळ शिवार, ता. सिल्लोड) याने अश्लील चाळे केले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. बाजीरावविरुद्ध गुरुवारी (२९ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाजीरावने तिला, तुझा पती मला नेहमी पैसे मागतो, त्याला बोलव, असे म्हणत अश्लील कृत्य केले. महिलेने त्याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

