शिवजयंतीचा उत्साह : आज सायंकाळपासूनच शहरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्यानिमित्त उद्या, १९ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. मिरवणुका दरवर्षी सकाळी ११ पासून मध्यरात्री १२ पर्यंत, संस्थान गणपती ते क्रांतीचौक, सिडको-हडको, टीव्ही सेंटर व गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर या ठिकाणी निघतात. मिरवणुका पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिक जमतात. आज, १८ फेब्रुवारीला सायंकाळपासूनच क्रांतीचौक येथील छत्रपती […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्यानिमित्त उद्या, १९ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. मिरवणुका दरवर्षी सकाळी ११ पासून मध्यरात्री १२ पर्यंत, संस्थान गणपती ते क्रांतीचौक, सिडको-हडको, टीव्ही सेंटर व गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर या ठिकाणी निघतात. मिरवणुका पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिक जमतात. आज, १८ फेब्रुवारीला सायंकाळपासूनच क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिक येतात. त्यामुळे क्रांतीचौक परिसरात व मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली आहे.

आज सायंकाळपासून उद्या मध्यरात्री १२ पर्यंत हे मार्ग सर्व वाहनांसाठी बंद…
-गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक, क्रांती चौक उड्डाणपूल पूर्व बाजू सर्व्हिस रोड ते क्रांती चौक उड्डाणपूल पश्चिम बाजू सर्व्हिस रोड.
या वाहनांना पर्यायी मार्ग : गोपाल टी- उत्सव मंगल कार्यालयमार्गे पुढे जातील. गोपाल टी- कोकणवाडी चौक- क्रांतीनगरमार्गे पुढे जातील. सिल्लेखाना ते सावरकर चौक- सतिश मोटर्समार्गे पुढे जातील. सिल्लेखाना ते खोकडपुरामार्गे पुढे जातील. क्रांती चौक उड्डाणपुल वाहतुकीसाठी सुरू राहील.

उद्या सकाळी ११ ते मध्यरात्री १२ पर्यंत हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद
१) राजाबाजार चौक- संस्थान गणपती- शहागंज- सिटीचौक- गुलमंडी पैठणगेट- सिल्लेखाना- क्रांतीचौक गोपाल टी.
२) सिडको एन-१२ नर्सरी टीव्ही सेंटर- जिजाऊ चौक- एम-२- एन-९- शिवनेरी कॉलनी पार्श्वनाथ चौक- बळीराम पाटील चौक- बजरंग चौक- अविष्कार चौक-शिवाजी महाराज पुतळा चिस्तीया चौक.
३) जयभवानीनगर चौक गजानन महाराज मंदिर व सेव्हनहील उड्डाणपूल-आदिनाथ चौक.
पर्यायी मार्ग असे :
१) शहागंज ते सिटीचौककडे येणारी वाहने चेलीपुरा- लोटा कारंजा- कामाक्षी लॉज या मार्गाचा वापर करतील.
२) क्रांतीचौक ते सिटीचौककडे जाणारी वाहने सावरकर चौक कार्तिकी हॉटेल चौक मिलकॉर्नर- भडकल गेट या मार्गाचा वापर करतील.
३) मिलकॉर्नरकडून औरंगपुराकडे येणारी वाहने अंजली टॉकीजसमोर उजवीकडे नागेश्वरवाडी निराला बाजार-समर्थनगरमार्गे किंवा अंजली टॉकीजजवळ डावीकडे खडकेश्वर- म.न.पा. मार्गे जातील.
४) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहने अण्णाभाऊ साठे चौक उध्दवराव पाटील चौक-सिध्दार्थ नगर चौक या मार्गाचा वापर करतील.
५) जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिरकडे येणारी व जाणारी वाहने जालना रोड मार्गाचा वापर करतील.
६) जवाहरनगर पो. स्टे. ते सेव्हनहीलकडे येणारी वाहने माणिक हॉस्पीटल, त्रिमूर्ती चौकमार्गे जातील व येतील. बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील. ही अधिसूचना पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. अधिसूचनेचा भंग करणारी व्यक्ती मो. वा. कायदा, म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असे सहायक पोलीस आयुक्‍त धनंजय पाटील यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

Latest News

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा! टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software