- Marathi News
- सिटी क्राईम
- विवाहितेने लावला पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप!; प्रेयसीही त्याच भागात राहते, पती गायब झाल्यावर फुट...
विवाहितेने लावला पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप!; प्रेयसीही त्याच भागात राहते, पती गायब झाल्यावर फुटले होते पोलिसांसमोर बिंग!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने दोन्ही मुलीच झाल्याचे निमित्त करून ३० वर्षीय विवाहितेला पती व सासरच्यांनी घराबाहेर काढले. तेव्हापासून विवाहिता माहेरी आई-वडिलांकडे छत्रपती संभाजीनगरात राहते. विवाहिता नोकरी करत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, हॉटेल चालविण्यासाठी तिला वारंवार माहेरून पैसे आणायला सांगितले, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार विवाहितेचे माहेर मुकुंदवाडी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने दोन्ही मुलीच झाल्याचे निमित्त करून ३० वर्षीय विवाहितेला पती व सासरच्यांनी घराबाहेर काढले. तेव्हापासून विवाहिता माहेरी आई-वडिलांकडे छत्रपती संभाजीनगरात राहते. विवाहिता नोकरी करत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, हॉटेल चालविण्यासाठी तिला वारंवार माहेरून पैसे आणायला सांगितले, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.
१९ मार्च २०२४ रोजी विवाहितेचा पती घरात कोणाला काही एक न सांगता निघून गेल्याने विवाहितेने जालन्याच्या चंदनझिरा पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर २४ मार्च रोजी पती पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांत सांगितले, की त्याचे आमच्याच गल्लीतील एका महिलेसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. या घटनेनंतरही पतीच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही. पती तिला, मला तुझ्या सोबत रहायचे नाही, मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही, असे म्हणायचा.
..अन् विवाहितेच्याच चारित्र्यावर संशय!
पती, सासू, सासरे व ननंद घरातील किराणा आणण्यासाठी व दोन मुलींच्या शिक्षणाच्या खर्चासाठी पैसे देत नव्हते. त्यामुळे विवाहितेने खासगी नोकरी सुरू केली. त्यावरून सासरच्या लोकांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन घालून पाडून बोलायला सुरुवात केली. “आमच्या घरातून निघून जा, तू जर आमच्या घरातून निघून गेली नाहीस तर आम्ही तुझे आई, वडील, भाऊ व मामा यांच्यावर खोटी केस करून त्यांचा काटा काढू,’ अशी धमकी देत असत. २ मे रोजी सासरच्या लोकांनी “तुला दोन्ही पण मुलीच झाल्या आहेत, आम्हाला मुलगा हवा होता, तू आम्हाला मुलगा देऊ शकत नाही. तू आमच्या कोणत्याही कामाची नाही’, असे म्हणून तिला दोन मुलींसह घरातून काढून दिले. तेव्हापासून ती माहेरी राहत आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार मिलिंद भंडारे करत आहोत.
