विधवा महिलेसोबत दुसरे लग्न करत वकिलाने घातला १ कोटीचा गंडा!, न्‍यू पहाडसिंगपुऱ्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घटस्फोटित वकिलाने विधवा महिलेला लग्नाची मागणी घातली. तिलाही आधाराची गरज होती. लग्न झाले. मात्र वकिलाने केवळ प्रॉपर्टीला पाहूनच तिच्यासोबत लग्न केल्याचे महिलेला आता कळले आहे. कारण १ कोटी रुपये हडपल्यानंतर तो तिला सोडून पहिल्या बायकोकडे राहायला गेला आहे. त्‍यामुळे ५३ वर्षीय महिलेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी वकिलासह […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घटस्फोटित वकिलाने विधवा महिलेला लग्नाची मागणी घातली. तिलाही आधाराची गरज होती. लग्न झाले. मात्र वकिलाने केवळ प्रॉपर्टीला पाहूनच तिच्यासोबत लग्न केल्याचे महिलेला आता कळले आहे. कारण १ कोटी रुपये हडपल्यानंतर तो तिला सोडून पहिल्या बायकोकडे राहायला गेला आहे. त्‍यामुळे ५३ वर्षीय महिलेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी वकिलासह त्‍याच्या कुटुंबीयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

न्यू पहाडसिंगपुऱ्यातील जगदिशनगरात राहणाऱ्या ५३ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीनुसार, ती आणि तिची मुलगी राहतात. त्यांचे नांदेडला घर असून ते भाड्याने दिलेले आहे. त्यांच्या पतीचे निधन झालेले असल्याचे हेरून घटस्फोटीत वकिलाने महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यामुळे नातेवाइकांच्या उपस्थितीत ४ सप्‍टेंबर २०१६ रोजी लग्न करण्यात आले. विवाहाचा संपूर्ण खर्च महिलेनेच केला.

वकील घटस्फोटीत होता. त्यामुळे त्याची बहीण, भाऊ यांच्या मध्यस्थीने महिलेची मालमत्ता पाहून लग्नाचा घाट घालण्यात आला. महिलेलाही आधाराची गरज होती. त्‍यामुळे तिने लग्नाला संमती दिली. काही वर्षे दोघांत चांगले चालल्यानंतर वकिलाने तिला पैशांसाठी मारहाण करायला सुरुवात केली. पहिल्या पत्नीकडे निघून गेला. वारंवार त्याने महिलेकडून १ कोटी रुपये घेतले असल्याचे तक्रारीत महिलेने म्‍हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वकीलासह त्‍याचे अयोध्यानगर, शिवनेरी कॉलनी, गरमपाणी, पाचोड येथील एकूण ६ नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे. तपास सहायक फौजदार संजीव गोमटे करत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software