वाळूज MIDC त दोन तरुणींची आत्‍महत्‍या; १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन विवाहित तरुणींनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याच्या घटना वाळूज एमआयडीसीत मंगळवारी (२७ ऑगस्ट) समोर आल्या आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी एकीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी ६ तर दुसरीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटना सिडको वाळूज महानगर आणि रांजणगाव शेणपुंजीतील आहेत. पहिल्या घटनेत सिडको वाळूज महानगरातील राहत्‍या घरात २४ वर्षीय मथुरा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन विवाहित तरुणींनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याच्या घटना वाळूज एमआयडीसीत मंगळवारी (२७ ऑगस्ट) समोर आल्या आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी एकीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी ६ तर दुसरीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटना सिडको वाळूज महानगर आणि रांजणगाव शेणपुंजीतील आहेत.

पहिल्या घटनेत सिडको वाळूज महानगरातील राहत्‍या घरात २४ वर्षीय मथुरा गोविंद पवार हिने मंगळवारी (२७ ऑगस्ट) रात्री गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. तिचे लग्न ६ वर्षांपूर्वी गोविंद दिलीप पवारसोबत झाले होते. ती पतीसह सिडको वाळूज महानगरात राहत होती. वर्षभर सासरच्या मंडळींनी चांगले वागविले. नंतर तू लग्नात संसारोपयोगी साहित्य आणले नाही, तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही, तुला स्वयंपाक येत नाही अशा कारणांवरून त्रास देणे सुरू केले. पती गोविंदने तिला कार घेण्यासाठी माहेरहून २ लाख घेऊन ये, अशी मागणी करत छळ सुरू केला. या छळाला कंटाळून तिने आत्‍महत्‍या केली. मथुराचा भाऊ दिगंबर सोमासे याच्या तक्रारीवरून पती गोविंद, सासू अलका, सासरे दिलीप, भाया रामकृष्ण, लता साबळे व सुभाष साबळे या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत रांजणगाव शेणपुंजी येथील २२ वर्षीय राणी नितीन चव्हाण हिने राहत्या घरी गळफास घेऊन मंगळवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी आत्महत्या केली. राणीचे लग्न नात्यातीलच नितीन बबन चव्हाणसोबत चार वर्षांपूर्वी झाले होते. काही दिवस चांगले नांदवल्यानंतर विहीर खोदण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली. यासाठी तिचा छळ सुरू केला.

राणीने मंठा पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी छळाची तक्रारही केली होती. नंतर नातेवाइकांनी मध्यस्थी केल्याने पुन्हा सासरी नांदायला आली. नंतर पतीने राणीकडे दुचाकी खरेदीसाठी माहेरहून ७० हजार रुपये आणण्याची मागणी केली होती. पती नितीन, नणंदा रितू व ममता यांनी यासाठी त्रास देणे सुरू केल्यावर राणीच्या वडिलांनी जावयाला दुचाकी खरेदीसाठी ७० हजार रुपये दिले होते. मात्र तरीही छळ सुरूच होता. या छळाला कंटाळून राणीने आत्‍महत्‍या केली. तिचे वडील रामेश्वर राठोड यांच्या तक्रारीवरून पती नितीन, सासू सिंधू, नणंदा रितू चव्हाण व ममता सुभेदार अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software