- Marathi News
- सिटी क्राईम
- रोकडिया हनुमान कॉलनीतील विज्ञानवर्धिनी हायस्कूलमधील धक्कादायक घटना… बातमी वाचताना तुमचा विश्वास बसण...
रोकडिया हनुमान कॉलनीतील विज्ञानवर्धिनी हायस्कूलमधील धक्कादायक घटना… बातमी वाचताना तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरंच असं घडलंय…शिक्षिकेने जे घडलं ते सर्व तक्रारीत मांडलंय…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रोकडिया हनुमान कॉलनीतील विज्ञानवर्धिनी हायस्कूलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (११ नोव्हेंबर) सकाळी मुख्याध्यापकांनी शाळा उघडली तेव्हा त्यांना समोर जे दिसले ते भयावह होते. काळी बाहुली, पांढऱ्या रांगोळीने गोल काढून त्यावर पणती, एका शिक्षिकेचे नाव लिहून तू गई… असे लिहिलेले, दोन लिंबू कापून त्यावर हळदी- कुंकू टाकलेले अन् काळे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रोकडिया हनुमान कॉलनीतील विज्ञानवर्धिनी हायस्कूलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (११ नोव्हेंबर) सकाळी मुख्याध्यापकांनी शाळा उघडली तेव्हा त्यांना समोर जे दिसले ते भयावह होते. काळी बाहुली, पांढऱ्या रांगोळीने गोल काढून त्यावर पणती, एका शिक्षिकेचे नाव लिहून तू गई… असे लिहिलेले, दोन लिंबू कापून त्यावर हळदी- कुंकू टाकलेले अन् काळे केस गुंडाळलेले… शाळेच्या बंद खोल्यांच्या कुलूपांना हळदी- कुंकू लावलेले… असे सारे चित्र पाहून मुख्याध्यापक हादरून गेले… या प्रकरणात क्रांती चौक पोलीस ठाण्यात ज्या शिक्षिकेचे नाव लिहून जादूटोणा केला गेला, त्या शिक्षिकेने तक्रार दिली असून, अज्ञात व्यक्तीकडून आपल्या जिवास धोका असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता काळ्या जादूवाल्या बाबाचा शोध सुरू केला आहे.
