मोठी बातमी : पंजाबच्या ६ गँगस्टर्सना समृद्धीच्या बोगद्यातच हॉलीवूडस्टाइल घेरले!; एके-४७ ने इनोवाची काच फोडून रोखल्या बंदुकी… छत्रपती संभाजीनगरातील थरार…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : टोळीयुद्धात तिघांची हत्‍या केल्यानंतर पंजाबचे सहा गँगस्टर्स नांदेडला आले. तिथून जालना, नंतर समृद्धी महामार्गाने मुंबईला जात असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरच्या साहसी पोलिसांनी बोगद्यातच त्‍यांना हॉलीवूडस्टाइल घेराव घातला… त्‍यांना कारमधून उतरण्याच्या सूचनाही देऊनही उतरत नसल्याने एके-४७ ने काच फोडून त्‍यांच्यावर बंदुका रोखण्यात आल्या…हा थरार शनिवारी (७ सप्‍टेंबर) पहाटे […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : टोळीयुद्धात तिघांची हत्‍या केल्यानंतर पंजाबचे सहा गँगस्टर्स नांदेडला आले. तिथून जालना, नंतर समृद्धी महामार्गाने मुंबईला जात असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरच्या साहसी पोलिसांनी बोगद्यातच त्‍यांना हॉलीवूडस्टाइल घेराव घातला… त्‍यांना कारमधून उतरण्याच्या सूचनाही देऊनही उतरत नसल्याने एके-४७ ने काच फोडून त्‍यांच्यावर बंदुका रोखण्यात आल्या…हा थरार शनिवारी (७ सप्‍टेंबर) पहाटे पाचला घडला. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे महाराष्ट्रच नव्हेतर पंजाबमध्येही कौतुक होत आहे.

अक्षयकुमार ऊर्फ बच्छा बलबीरसिंग (२१), गुरुप्रीत दर्शनसिंग गोपी (२५), दिलेरसिंग मनिंदर चिवनसिंग (२२), प्रिन्स काका संधू (१८), सुखचैनसिंग गब्बर सिंग जास (२०), रवींद्रसिंग कर्णेलसिंग (२१) अशी अटक केलेल्या गँगस्टर्सची नावे आहेत. त्यांना अटक केल्याचे कळताच पंजाबचे अधिकारी विमानाने शनिवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले.

फ्‍लॅशबॅक…
पंजाबच्या फिरोजपूर शहरात २ महिन्यांपासून गँगवार सुरू आहे. यातूनच ३ सप्टेंबरला ९ गँगस्टर्सनी दुचाकीवरून येत कारमधील आकाशदीप सिंह, त्याचा मुलगा दिलप्रीत सिंह आणि मुलगी जसप्रीत कौर यांची हत्या केली. हल्लेखोरांनी २० राऊंड फायर केले. जसप्रीतचे एक महिन्यानंतर लग्न होणार होते. लग्नाच्या खरेदीसाठी तिघे बापलेक निघाले होते. जाताना त्यांनी अकालगढ गुरुद्वारात दर्शन घेतले. गुरुद्वारातून बाहेर पडल्यावर कारमध्ये बसत असतानाच त्‍यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेने पंजाबमध्ये खळबळ उडाली. पंजाबच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अप्पर महासंचालक प्रमोद बान यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके तैनात केली. युद्धपातळीवर त्‍यांचा शोध सुरू केला. केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही अलर्ट झाल्या.

नांदेडला मुक्काम, मुंबईला पळून जाण्याचा प्लॅन…
६ हल्लेखोर रेल्वेने गुरुवारी (५ सप्‍टेंबर) नांदेडला गेल्याचे यंत्रणांच्या तपासात समोर आल्याने महाराष्ट्रातील नेटवर्कच्या आधारे त्‍यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. शुक्रवारी एका धार्मिकस्थळात मुक्काम करून खासगी कारने हल्लेखोर मुंबईला पळून जात होते. नांदेडवरून पहाटे तीनला ते जालन्यात पोहोचले. जालन्यात पाऊण तास वेळ घालवला. तिथून समृध्दी महामार्गाने मुंबईला निघाले होते. पंजाबच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अप्पर महासंचालक प्रमोद बान यांनी छत्रपती संभाजीनगर शहरचे पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांना संपर्क केला.

… अन्‌ ॲक्शन!
पोलीस आयुक्‍त श्री. पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे गँगर्स्टसना पकडण्याची मोहीम सोपवली. श्री. गुरमे व गजानन कल्याणकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे, विनायक शेळके, संदीप सोळंके, विशाल बोडखे, प्रवीण वाघ, प्रशांत मुंढे, महादेव गायकवाड, सचिन वायाळ, बलभीम गोरे यांच्यासह तब्बल ४० शीघ्र कृती दलाच्या जवानांसह मोहीम आखली. गँगस्टर्सवर समृद्धीच्या बोगद्यातच हल्लाबोल करण्याचे ठरले. दोन्ही दिशेने एके-४७, एमपी-५ बंदुकीसह पोलीस वाहनात बसून होते. बोगद्याच्या टोकाला तीन ट्रक उभे करण्यात आले. गँगस्टर्सची इनोव्हा कार तेथे येताच थांबली. त्याचवेळी चारही दिशेने पोलिसांनी कारला घेराव घातला. त्यांच्याकडे शस्त्रांची शक्यता होती. त्‍यामुळे आधी दुरून त्यांना कारखाली उतरण्याची सूचना केली. मात्र ते ऐकत नव्हते. त्‍यामुळे दोन उपनिरीक्षकांनी एके-४७ ने कारची काच फोडून त्यांच्यावर बंदुका रोखण्यात आल्या.

गुप्तचर यंत्रणा होत्या अलर्ट…
हल्लेखोर नांदेडला आल्याचे कळताच त्‍यांच्यावर पाळत ठेवणे सुरू झाले. जालन्याला ते पाऊण तास थांबले. तेही गुप्‍तचर अधिकाऱ्यांनी हेरले. ते समृद्धीवर येताच शहर पोलिसांना ॲक्‍शनच्या सूचना करण्यात आल्या. पोलीस आयुक्त श्री. पवार यांनी एवढी मोठी कामगिरी करणाऱ्या पथकाला ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शहर पोलिसांचे सगळीकडे कौतुक होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

Latest News

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा! टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software