- News
- सिटी क्राईम
- मुजोर पोलिसाने डिलीव्हरी बॉयला सटासट लाठीने मारले, ओठ फुटून सर्व अंगावर रक्ताचे वळ उमटले…नागरिकांनी
मुजोर पोलिसाने डिलीव्हरी बॉयला सटासट लाठीने मारले, ओठ फुटून सर्व अंगावर रक्ताचे वळ उमटले…नागरिकांनी धावून वाचवले!; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको पोलीस ठाण्याचा मुजोर पोलीस अंमलदार जीवन शेजवळ याने क्रूरतेचा कळस गाठत डिलीव्हरी बॉयवर सटासट लाठ्या मारल्या, यात ओठ फुटून त्याच्या संपूर्ण अंगावर रक्ताचे वळ उमटले, ताे गंभीर जखमी झाला. त्याचा आक्रोश ऐकून नागरिकांनी धाव घेऊन त्याची सुटका केली म्हणून वाचला… ही संतापजनक घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) आविष्कार कॉलनीत घडली. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको पोलीस ठाण्याचा मुजोर पोलीस अंमलदार जीवन शेजवळ याने क्रूरतेचा कळस गाठत डिलीव्हरी बॉयवर सटासट लाठ्या मारल्या, यात ओठ फुटून त्याच्या संपूर्ण अंगावर रक्ताचे वळ उमटले, ताे गंभीर जखमी झाला. त्याचा आक्रोश ऐकून नागरिकांनी धाव घेऊन त्याची सुटका केली म्हणून वाचला… ही संतापजनक घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) आविष्कार कॉलनीत घडली. शेजवळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखत घेत त्याचे निलंबन केले आहे.
जितेंद्र लक्ष्मण मानके (वय ३०, रा. सिडको एन ६) हा सकाळी वर्तमानपत्र वाटतो. टीव्ही सेंटर चौकात त्याची २००७ पासून पेपरची एजन्सी आहे. कुटुंबाला आर्थिक हातभारासाठी सहा महिन्यांपासून तो फ्लिपकार्टसाठी डिलीव्हरी बॉय म्हणूनही काम करतो. सोमवारी पहाटे ४ ते ७ दरम्यान त्याने वृत्तपत्र वाटप केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मयूर पार्क येथील ई-कॉम एक्स्प्रेस कार्यालयातून त्याला ८३ पार्सल वाटप करण्यासाठी दिले होते. पार्सल घेऊन निघाला असता त्याला पोलीस अंमलदार जीवन शेजवळ याचा कॉल आला. त्यावेळी जितेंद्रने सांगितले, की आताच पार्सल वाटप करणे सुरू आहे. पाऊस असल्याने थोड्या वेळात तुमचे पार्सल आणून देतो. पावसामुळे त्यांना उशीर झाला होता. या दरम्यान शेजवळने चार कॉल केले.
दुपारी अडीचला त्याने आविष्कार कॉलनीत येऊन शेजवळला कॉल केला. तेव्हा शेजवळ थेट फायबरची काठी घेऊनच आला. शिवीगाळ करून इतक्या उशिरा पार्सल आणतो का, असे म्हणत बेदम मारहाण सुरू केली. जीवनच्या शरीरावर त्याने सटासट लाठ्या बरसल्या. यात जीवन जखमी झाला. ओठ फुटून अंगावर रक्ताचे वळ उमटले. हैवानीयत अंगात संचारलेल्या शेजवळची मारहाण थांबत नव्हती, जीवन जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्यामुळे लोक धावून आले. त्यांनी शेजवळच्या तावडीतून जीवनची सुटका केली आणि रुग्णालयात नेले. ही घटना उजेडात येताच कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी गंभीर दखल घेतली. शेजवळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचे निलंबनदेखील केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, वृत्तपत्र विक्रेता संघटनेनेही या घटनेचा निषेध केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

