बांधकाम विभागाचे कार्यालय फोडत स्वतःचे कृत्‍य केले सोशल मीडियावर LIVE, छत्रपती संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटीच्या कर्मचारी निवासस्थान परिसरातील ड्रेनेजलाइन वारंवार खराब होत असून चोवीस तास दुर्गंधी पसरत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त तरुणाने शुक्रवारी (६ सप्‍टेंबर) दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून तोडफोड सुरू केली. स्वतःचे कृत्‍य त्‍याने सोशल मीडियावर लाइव्हसुद्धा केले आणि हे कार्यालय फक्‍त ठेकेदारांसाठीच आहे का, असा सवालही […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटीच्या कर्मचारी निवासस्थान परिसरातील ड्रेनेजलाइन वारंवार खराब होत असून चोवीस तास दुर्गंधी पसरत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त तरुणाने शुक्रवारी (६ सप्‍टेंबर) दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून तोडफोड सुरू केली. स्वतःचे कृत्‍य त्‍याने सोशल मीडियावर लाइव्हसुद्धा केले आणि हे कार्यालय फक्‍त ठेकेदारांसाठीच आहे का, असा सवालही केला.

घाटी रुग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांतील बहुतांश इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. गेल्या ६० वर्षांपासून या इमारती उभ्या आहेत. त्‍यामुळे वारंवार ड्रेनेजलाइन खराब होत असते. उपाययोजना केल्या जात नसल्याने दुर्गंधी पसरून घाणेरडे पाणी स्थानिकांच्या घरात शिरते. त्‍यामुळे वैतागलेल्या शेर खान नावाच्या तरुणाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. मात्र सहा महिने उलटूनही त्याच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.

लाखो रुपये खर्चून संरक्षण भिंत आणि ड्रेनेजलाइन नव्याने करण्यात आली. तरीही ड्रेनेजची समस्या सुटली नाही. शुक्रवारी ड्रेनेजलाइन चोकअप होऊन अनेकांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी तुंबले. त्‍यामुळे संतप्त शेरखानने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. मात्र एकही अधिकारी हजर नसल्याने सोशल मीडियावर लाइव्ह करत कार्यालयाची तोडफोड सुरू केली. हे कार्यालय फक्त ठेकेदारासाठी आहे का, असा सवाल तो करत होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software