फेसबुकवर तिची फ्रेंडरिक्‍वेस्ट, गोड गोड बोलणं, सरकारी अधिकारी गेला हुरळून…, १६ लाखांना चंदन!; छ. संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फेसबुकर अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारणे, तिच्यासोबत चॅटिंग करणे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सरकारी नोकरदाराला १६ लाख ६९ हजार ७२७ रुपयांत पडले. महिलेने मौल्यवान वस्तू व विदेशी चलन पाठवत असल्याचे सांगितले. त्‍यानंतर भामट्यांनी कस्टममधील अधिकारी बोलत असल्याचे भीती दाखवत लूट केली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मिलिंद आश्रू म्हस्के (वय ५४, रा. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फेसबुकर अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारणे, तिच्यासोबत चॅटिंग करणे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सरकारी नोकरदाराला १६ लाख ६९ हजार ७२७ रुपयांत पडले. महिलेने मौल्यवान वस्तू व विदेशी चलन पाठवत असल्याचे सांगितले. त्‍यानंतर भामट्यांनी कस्टममधील अधिकारी बोलत असल्याचे भीती दाखवत लूट केली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मिलिंद आश्रू म्हस्के (वय ५४, रा. शिवाजीनगर, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद म्‍हस्के यांना कॅलरा अमोंग नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. म्‍हस्के यांनी ती स्वीकारताच तिने बोलायला सुरुवात केली. चॅटिंगमधून मैत्री घट्ट झाली. त्यानंतर दोघांनी व्हॉट्सअॅप क्रमांक शेअर केले. व्हॉट्‌स ॲपवर बोलणे सुरू असताना महिलेने ऑनलाइन गिफ्ट पाठवते, असे म्हणून पूर्ण पत्ता व माहिती मागितली. म्‍हस्के यांनी देताच काही दिवसांनी कॉल आला. आम्ही कस्टममधील अधिकारी बोलत असून, तुमचे पार्सल कस्टममध्ये अडकले आहे. तुम्हाला कस्टम ड्युटी भरून ते सोडवावे लागतील, अन्यथा तुमचे पार्सल रद्द होऊ शकते.

तुमच्यावर ईडी आणि आयकरची कारवाई होऊ शकते, असे सांगितले. विश्वास बसण्यासाठी व्हॉट्‌स ॲपवर त्‍यांनी आयकार्डही पाठविले. ई-मेलही केला. घाबरलेल्या म्‍हस्के यांनी कस्टम ड्यूटी आणि पार्सल चार्जेसच्या नावाखाली एका बँक खात्यातून ३ लाख ८६ हजार १५१ रुपये पाठविले. त्यानंतर दुसऱ्या बँक खात्यातून १२ लाख ८३ हजार ५७६ रुपये पाठविले. एकूण १६ लाख ६९ हजार ७२७ रुपये पाठवूनही पार्सल आणि मौल्यवान वस्तू काही आल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्‍यांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीची घटना १७ सप्टेंबर २०१९ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे. फसवणूक झाल्याचे म्‍हस्के यांच्या १७ जानेवारी २०२० रोजी लक्षात आले. त्यानंतर पाच वर्षांनी आता १६ फेब्रुवारी २०२५ रोजी त्‍यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software