पालक मोबाइल खेळू देत नाहीत १५ वर्षीय मुलीने सोडले घर… पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करून जालन्यातून आणले सुखरुप परत..!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा): आईवडिलांचे सततचे रागावणे, मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणातून १५ वर्षीय मुलीने घर सोडले व ती थेट जालन्याला मैत्रिणीच्या घरी गेली. गुरुवारी (१ ऑगस्ट) दुपारी पोलिसांनी तिला जालन्यातून आणत आई-वडिलांकडे सुरक्षित सुपूर्द केले. मंगळवारी (३० जुलै) सायंकाळपासून गुरुवारपर्यंत या घटनेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. वेदांतनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल मुलीच्या आई-वडिलांनी आभार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा): आईवडिलांचे सततचे रागावणे, मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणातून १५ वर्षीय मुलीने घर सोडले व ती थेट जालन्याला मैत्रिणीच्या घरी गेली. गुरुवारी (१ ऑगस्ट) दुपारी पोलिसांनी तिला जालन्यातून आणत आई-वडिलांकडे सुरक्षित सुपूर्द केले. मंगळवारी (३० जुलै) सायंकाळपासून गुरुवारपर्यंत या घटनेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. वेदांतनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल मुलीच्या आई-वडिलांनी आभार मानले.

समिक्षा (नाव बदलले आहे) आईवडिलांना एकुलती एक असून, आई-वडील खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. काही दिवसांपासून समिक्षा कायम मोबाइल घेऊन बसलेली असायची. यात तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने आई-वडील रागावत होते. मंगळवारीही ती मोबाईलमध्ये गुंग असल्याने आई- वडिलांनी तिला खडसावले. याचा तिला इतका राग आला, की मैत्रिणीकडे चालल्याचे सांगून सायंकाळी सहाला तिने घर सोडले. काही वेळात परत येईल, असे आईवडिलांना वाटले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती न परतल्याने आई-वडील हादरून गेले. त्‍यांनी तिचा शोध सुरू केला. मैत्रिणी, नातेवाइकांकडे चौकशी करून झाल्यावर त्‍यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांना समिक्षाचा शोध सुरू केला. जवळच्या मैत्रिणींची चौकशी केल्यावर ती सिडको बसस्थानकाकडे गेल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांनी तांत्रिक तपास केल्यावर ती जालन्याच्या दिशेने गेल्याचे कळताच मुंडे सहकाऱ्यांसह जालन्याला गेले. तेथील तिच्या मैत्रिणीचे घर गाठताच ती सुरक्षित मिळून आल्याने पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. समिक्षाने आई-वडील रागावत असल्याने व मोबाइल खेळण्यास नकार देत असल्याने घर सोडल्याची कबुली दिली. या घटनेमुळे तब्बल दीड दिवस पोलीस अक्षरशः आटापिटा करून तिला शोधत होते. तिला सुरक्षित आणल्याचे पाहून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत पोलिसांप्रती कृतज्ञता दिसून आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software