परधर्मीय मुलीसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणाला अटक; अपनी बच्ची को भगा के ले जा रहा है म्हणत जमावाने केली होती मारहाण, जमावाविरुद्धही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परधर्मीय मुलीसोबत रस्त्यावर गप्पा मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्‍याला जमावाने बेदम मारहाण केली होती. त्‍याला आता अटक करण्यात आली असून, त्‍याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्धही गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात (लेबर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परधर्मीय मुलीसोबत रस्त्यावर गप्पा मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्‍याला जमावाने बेदम मारहाण केली होती. त्‍याला आता अटक करण्यात आली असून, त्‍याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्धही गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात (लेबर कॉलनी) २५ जून रोजी दुपारी घडली होती.

आकाश सुनील शिंदे (वय १९, रा. देवगाव फाटा, येवला, ह. मु. आदर्शनगर, केम्ब्रिजमागे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्‍याला फातेमा (नाव बदलले आहे) नावाची अल्पवयीन मैत्रीण आहे. दोघे गप्पा मारत असतानाच दोन दुचाकीवर चार जण तिथे आले. त्यांनी आकाशला बुरख्यातील ही मुलगी तुझी कोण आहे, अशी विचारणा केली. त्यावर आकाशने मैत्रीण असल्याचे सांगितले. त्‍यामुळे चौघांनी त्‍याला मारहाण करत लोकांना जमा केले.

देखो अपनी बच्ची को भगा के ले जा रहा है, असे म्हणत विशिष्ट धर्माच्या लोकांना बोलावल्याने मोठा जमाव जमला. या जमावाला आकाशने ती माझी केवळ मैत्रीण आहे, असे सांगितले. पण जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्‍यांनी आकाशला बेदम मारहाण सुरूच ठेवली. अल्पवयीन मुलीलाही मारहाण केली. दोघांना जमावाने मोकळ्या जागेत नेत जान से मार डालो साले को, बचना नही चाहिये, असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्‍न केला. यात आकाश गंभीर जखमी झाला. कसाबसा जीव वाचवून त्याने तिथून पळ काढला.

आकाशला जीवे मारण्याचा प्रयत्‍न केल्याने सिटी चौक पोलिसांनी मारहाण करणाऱ्या १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाशने तक्रार दिल्याचे कळताच आकाशच्या मैत्रिणीनेही आकाशविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. आकाश माझी इच्छा नसतानाही गळ्यात हात टाकत होता. तू असे करू नको, मला नंतर फोन करू नको, भेटू नको, असे म्हणूनही आकाश ऐकत नव्हता, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी आकाशविरुद्ध पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software