धुळे-सोलापूर हायवेवर हिट ॲन्‍ड रन; सुसाट वाहनाने उडवल्याने महिलेचा जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर हायवेवर सुसाट वाहनाने ६९ वर्षीय महिलेला धडक देऊन पळ काढला. यात महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना यांना सोलापूर- धुळे हायवेवरील शेखापूर शिवारात तनवाणी शाळेसमोर शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी साडेसहाला घडली. अफसराबी शेख रहीम या (वय ६९, रा. सिल्कमिल कॉलनी) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अफसराबी शेख यांचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर हायवेवर सुसाट वाहनाने ६९ वर्षीय महिलेला धडक देऊन पळ काढला. यात महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना यांना सोलापूर- धुळे हायवेवरील शेखापूर शिवारात तनवाणी शाळेसमोर शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी साडेसहाला घडली.

अफसराबी शेख रहीम या (वय ६९, रा. सिल्कमिल कॉलनी) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अफसराबी शेख यांचा मुलगा शेख अजिम शेख गफूर (वय ३७,रा. रेल्वेस्टेशनजवळ सिल्कमिल कॉलनी) यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दिली आहे. ते इर्टिका कार चालवून उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी साडेसहाला त्‍यांचा मित्र शेख शाहरुख यांनी कॉल करून अपघाताची माहिती दिली. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह पसार झाला. नागरिकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून अफसराबी यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अफसराबी यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...