धक्कादायक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने BAMS च्या विद्यार्थिनीला प्रेमात अडकवले, पण लग्नास नकार, जात वेगळी असल्याचे कारण केले पुढे, तिने सलीम अली सरोवरात केला प्राणत्‍याग..!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेमाचा अर्थच आजच्या तरुण पिढीने बदलून टाकला आहे. प्रेमासाठी काय पण म्‍हणणारे तरुण- तरुणी नंतर दोघांच्या यशाची तुलना करायला सुरुवात करतात. नंतर कळून चुकते की आपण आपल्या लायक नसलेल्या व्यक्‍तीसोबत प्रेम करत आहोत… यश, पैसा या गोष्टी प्रेमापेक्षा महत्त्वाच्या वाटू लागतात…. न कळत्‍या वयात प्रेम झाले, पण पुढे तो अभियांत्रिकीचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेमाचा अर्थच आजच्या तरुण पिढीने बदलून टाकला आहे. प्रेमासाठी काय पण म्‍हणणारे तरुण- तरुणी नंतर दोघांच्या यशाची तुलना करायला सुरुवात करतात. नंतर कळून चुकते की आपण आपल्या लायक नसलेल्या व्यक्‍तीसोबत प्रेम करत आहोत… यश, पैसा या गोष्टी प्रेमापेक्षा महत्त्वाच्या वाटू लागतात…. न कळत्‍या वयात प्रेम झाले, पण पुढे तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ लागला तर ती आयुर्वेद बीएएमएसचे शिक्षण… नंतर त्‍याला साक्षात्‍कार झाला, की आपल्या जाती वेगळ्या… लग्नाला त्‍याने स्‍पष्ट शब्‍दांत नकार दिला… ती आकंठ प्रेमात बुडालेली… त्‍याला ती पत्‍नी म्‍हणून नको होती, पण प्रेमासाठी हवी होती… त्‍यावरून दोघांत वाद झाला. तो तिच्या काही आक्षेपार्ह गोष्टींवरून तिला ब्‍लॅकमेल करू लागला.. अन्‌ व्हायचे तेच झाले, प्रेयसीने सलीम अली सरोवरात उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. २२ ऑगस्टला तिचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध आज, २३ ऑगस्टला गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अपूर्वा दिलीप गजहंस (२१, रा. राणा पेट्रोल पंपाच्या मागे, पडेगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्या विद्यार्थिनीचे तर, किरण कांबळे (वय २१) असे प्रियकराचे नाव आहे. दोघे अकरावीपासून सोबत शिकत होते. त्यांच्यात मैत्री अन्‌ नंतर प्रेम झाले होते. आशा दिलीप गजहंस (वय ५०, रा. मीरानगर, पडेगाव) यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यांचे पती चार वर्षांपूर्वी मरण पावले आहेत. त्‍यांना एक मुलगा, तीन मुली आहेत. दोन नंबरची मुलगी अपूर्वा ही संगमनेरच्या अश्विन रुरल आयुर्वेदिक कॉलेजमध्ये BAMS च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. १७ ऑगस्टला रक्षाबंधनसाठी ती घरी आली होती. २० ऑगस्टला अपूर्वा सकाळी अकराच्या सुमारास आईला सांगून गेली की, मी इशा या मैत्रिणीकडे चालले आहे. त्यानंतर दीडच्या सुमारास इशाचा कॉल आशा गजहंस यांना आला.

इशाने कॉलवर सांगितले, की मी, अपूर्वा व आमचा मित्र किरण कांबळे असे निरालाबाजार येथे असताना अपूर्वा व किरण कांबळे यांचा एकमेकांसोबत वाद झाला असून, मी व अपूर्वा अशा SB कॉलेजजवळ थांबलो आहोत. अपूर्वा खूप चिडचिड करीत आहे. तुम्ही तिला येथे येऊन घेऊन जा. त्यावरून आशा यांनी अपूर्वाला कॉल करून विचारणा केली असता तिने सांगितले की, मी इशासोबत असून थोडे थांबून घरी येते. त्यानंतर परत इशाचा कॉल आला व अपूर्वाला घेऊन जाण्याबाबत सांगितले. त्यावर आशा यांनी तिला सांगितले, की मी येईपर्यंत तू तिला सोडू नको. मी येते… त्यावर इशा म्हणाली की, मला माझ्या आईने बोलावले आहे. त्यानंतर आशा यांनी अपूर्वाला वारंवार कॉल केला असता तिने कॉल उचलला नाही.

त्यानंतर आशा यांनी इशाला कॉल केला असता तिने सांगितले की, मी घरी आले असून अपूर्वा ही SB कॉलेजच्या पार्किंगमध्ये बसलेली आहे. त्यानंतर आशा या दोन्ही मुलींसोबत अपूर्वाला घेण्यासाठी SB कॉलेजच्या पार्किंगमध्ये गेली. परंतु तिथे अपूर्वा मिळून आली नाही. त्यामुळे आशा यांनी तिला खूप कॉल केले. पण ती उचलत नव्हती. तिला संध्याकाळी सहापर्यंत शोधले पण तिचा फोन बंद झाला. त्यानंतर अपूर्वाही मिळून येत नसल्याने तक्रार देण्यासाठी आशा यांनी छावणी पोलीस ठाणे गाठले. तिथे पोलीस उपनिरीक्षक श्री. जगदाळे यांना भेटून हकीकत सांगितली. त्यांनी अपूर्वा हिच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता तिचे लास्ट लोकेशन दाभाडे कॉम्प्लेक्स सलीम अली सरोवरच्या पाठीमागे रोजबाग परिसर येथे आले. त्‍यामुळे आशा यांनी त्या ठिकाणी जाऊन अपूर्वाचा शोध घेतला त्याठिकाणीही ती मिळून आली नाही. त्‍यामुळे रात्री उशीरा छावणी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली…

थेट मृतदेहच मिळाला!
२३ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री. जगदाळे यांनी आशा यांना कळवले, की तुमच्या भाचीच्या वर्णनाप्रमाणे सलीम अली सरोवरातून एका मुलीचा मृतदेह मिळून आला आहे. मृतदेह घाटी रुग्णालयात नेला आहे. तिथे जाऊन खात्री करा. त्‍यामुळे आशा या भाऊ व मोठ्या मुलीचे पती लक्ष्मण कांबळे यांच्यासह घाटी रुग्णालयात गेल्या असता मृतदेह अपूर्वाचाच असल्याचे दिसले.

किरण कांबळेसोबत होते प्रेमसंबंध…
मुलगी अपूर्वा गजहंस हिचे किरण कांबळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. याबाबत अपूर्वाने दोन महिन्यांपूर्वी आईला सांगितले होते की. आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यावरून आशा यांनी किरणला याबाबत विचारले असता त्यानेही तेच सांगितले. त्‍यावेळी आशा यांनी तुम्ही दोघे लग्न करणार आहे का, असे त्याला विचारले असता त्याने सांगितले की, माझी व तुमची जात वेगळी आहे. त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. त्यावेळीच आशा यांनी त्याला समजावून सांगितले की, तुला लग्न करायचे नसेल तर अपूर्वाशी कसलाही संबंध ठेऊ नको. तीही तुझ्यासोबत बोलणार नाही.

अपूर्वाच्या आक्षेपार्ह गोष्टींच्या आधारे करू लागला टॉर्चर…
आशा यांनी समजावून सांगितल्यानंतरही किरण कांबळेने अपूर्वासोबत वारंवार संपर्क सुरूच ठेवला. अपूर्वाने त्‍याला बजावले, की माझ्यासोबत पुन्हा संपर्क करू नको. त्‍यावर त्‍याने धमकावणे सुरू केले. अपूर्वाच्या काही आक्षेपार्ह गोष्टी त्‍याच्याकडे होत्‍या. त्‍याआधारे तो तिला टॉर्चर करत होता. ही बाब अपूर्वाने आईला सांगितली होती. त्‍याच्या त्रासाला कंटाळूनच अपूर्वाने सलीम अली सरोवरात आत्‍महत्‍या केल्याचे आशा यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी किरण कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software